राजकुमार हे 80-90च्या दशकातील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक होते. आज भलेही ते आपल्यात नसेल, पण त्यांचे दमदार डायलॉग आजही लोकांच्या कानात गुंजतात. त्यांची डायलॉग डिलिव्हरी आणि अप्रतिम अभिनयामुळे त्यांना नायकाच्या भूमिकेपेक्षा अधिक ओळख मिळाली. राजकुमार हे अशा अभिनेत्यांपैकी एक होते जे स्वतःच्या अटींवर काम करायचे, म्हणूनच ते चित्रपटांसाठी वाट्टेल ते पैसे घेत असत. जरी त्यांचा शेवटचा रिलीज झालेला चित्रपट फ्लॉप झाला असेल.
राजकुमार (rajkumar) यांच्याशी संबंधित एक किस्सा इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध आहे. ताे म्हणजे त्याची फी वाढवण्याची कहाणी. माध्यमातील वृत्तानुसार, राजकुमार त्यांचा प्रत्येक चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांची फी एक लाख रुपयांनी वाढवत असे. मग त्यांचा शेवटचा चित्रपट फ्लॉप झाला असला तरी त्यांना त्यांची प्रतिमा किंवा लोकप्रियता कमी होईल याने काहीही फरक पडत नसे, उलट फ्लॉप चित्रपट देऊनही ते फी वाढवत असे.
राजकुमार यांनी सांगितले फ्लॉप चित्रपटानंतरही फी वाढण्याचे कारण
‘फ्लॉप चित्रपटानंतरही फी का वाढवतात?’, असा प्रश्न अभिनेत्यावा विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “मी कोणतीही भूमिका पुर्ण मनापासून साकरताे. त्यात मी नापास झालो असे मला कधीच वाटत नाही. चित्रपट फ्लॉप होऊ शकतात, मी नाही.”
राजकुमार यांनी असेही सांगितले होते की, “माझे चित्रपट फ्लॉप झाले, तरी माझी फी एक लाख रुपयांनी वाढायची. एकदा माझ्या सेक्रेटरीने विचारले की, ‘राज साहेब चित्रपट फ्लॉप झाला, मग तुम्ही एक लाख रुपये फी का वाढवत आहात?’, तेव्हा मी उत्तर दिले की, “पिक्चर चालला नाही, म्हणजे मी नापास झालो असे नाही, त्यामुळे फी एक लाखाने वाढेल.”
राजकुमार यांचे डायलॉग्स केवळ चित्रपटातच नाही, तर वैयक्तिक आयुष्यातही खूप प्रसिद्ध होते. ते खऱ्या आयुष्यातही आपल्या खास स्टाइलने बोलत असे. मात्र, 1996 मध्ये अभिनेत्याचे कॅन्सरमुळे निधन झाले.(bollywood actor rajkumar used to increased his fees after even giving flop film actor once disclosed reason said i am not fail)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एका डोळ्याने दिसत नसूनही साऊथसोबतच बॉलिवूडमध्ये देखील केला ‘या’ अभिनेत्याने आपल्या अभिनयाने धमाका
‘मला लाज नाही…’, अभिनेत्री दिव्या अग्रवालने व्हिडिओ शेअर करत अनुराग कश्यपकडे मागितले काम