Thursday, April 18, 2024

राम चरणने उपासनासाठी आयोजित केली भव्य बेबी शॉवर पार्टी, अल्लू अर्जुनसह ‘या’ स्टार्सने लावली हजेरी

साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनी लवकरच आई-वडील होणार आहेत. नुकतेच उपासनाने दुबईत तिचा बेबी शॉवर साजरा केला. अशातच, पुन्हा एकदा या जोडप्याने कुटुंब आणि मित्रांसह त्यांच्या घरी एक भव्य बेबी शॉवर पार्टी आयोजित केली हाेती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राम चरणच्या घरी झालेल्या बेबी शॉवर पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यामध्ये अल्लू अर्जुन ते टेनिसपटू सानिया मिर्झा, गायिका कनिका कपूर अश्या दिग्गज स्टार्सचा समावेश हाेता. एका फोटोंमध्ये अल्लू अर्जुन आणि राम चरण एकत्र उभे आहेत आणि दोघेही माईकवर काहीतरी बोलताना दिसत आहेत. यादरम्यान कनिका आणि सानियाने उपासनासोबत अनेक पोज दिल्या.

उपासनाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘ती जुलैमध्ये आपल्या बाळाचे स्वागत करू शकते.’ ती म्हणाली हाेती की, ‘सर्व पालकांप्रमाणेच ते आणि राम चरण देखील बाळाबद्दल खूप उत्सुक आहेत. त्याच्या घरातही अनेक दिवसांपासून या गुड न्यूजची वाट पाहत होते, जी त्यांना खूप दिवसांनी आता मिळणार आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

राम चरण आणि उपासना यांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली हाेती. एकत्र शिकत असताना राम आणि उपासना खूप चांगले मित्र बनले आणि नंतर दाेघे लग्नबंधनात अडकले. राम चरण आणि उपासना यांची जोडी चाहत्यांना मेड फॉर ईच अदर वाटते.

राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेता ‘RRR’च्या यशानंतर ‘गेम चेंजर’मध्ये दिसणार आहे. यात राम चरणसाेबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट कार्तिक सुब्बुराज लिखित, ‘गेम चेंजर’ शंकरचा पहिला तेलगु चित्रपट आहे.(bollywood actor ram charan host grand baby shower party wife upasana konidela )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अनुपम काका, पापा तुमच्यापेक्षा चांगला डान्स करायचे, पण…’ सतीश कौशिक यांच्या मुलीचा गोंडस व्हिडिओ व्हायरल

विराट कोहलीने अनुष्कासोबत जिममध्ये केला डान्स; पाय माेडताच क्रिकेटरने केली आरडाओरड, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा