बॉलीवूडचे दमदार अभिनेते सतीश कौशिक आता या जगात नाही, पण त्यांच्या सर्व आठवणी मनात जिवंत आहेत. त्यांची मुलगी वंशिका हिने अलीकडेच आपल्या वडिलांची आठवण काढली आणि त्यांना अनुपम खेरपेक्षा चांगले डान्सर म्हटले. खरे तर, वंशिका हिने पहिल्यांदाच काका अनुपम खेरसाेबत रिल बनवला आहे. दोघांचा हा व्हिडिओ खूपच क्यूट असून चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
या व्हिडिओमध्ये सतीश कौशिक (satish kaushik) यांची मुलगी वंशिका बसून गाण्यावर लिप सिंक करत आहे, तर तिच्या मागे अनुपम खेर (anupam kher) उभे असून ते वंशिकाची कॉपी करत आहेत. यावेळी दोघेही खूप आनंदी आणि क्यूट दिसत आहेत.
View this post on Instagram
वंशिकाने वडिल सतीश काैशिकसाेबत केली अनुपम खेरची तुलना
हा रील शेअर करताना वंशिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अनुपम काकासोबत माझी पहिली रील. त्याला अजून थोडी रिहर्सल करायची आहे, त्याच्या तुलनेत पापा एक चांगला डान्सर होता. पण प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद अनुपम काका. तुझ्यावर प्रेम आहे.’
या स्टार्सने व्हिडिओवर कमेंट करत केला प्रेमाचा वर्षाव
या व्हिडिओवर चाहत्यांसह बाॅलिवूड स्टार्सनेही कमेंट केली आहे. हृतिक रोशनने या व्हिडिओवर कमेंट करत ‘हाहा, गोड’ असे लिहिले, तर गुरु रंधावा यांनी हार्ट इमोजी टाकला. त्याचवेळी चाहते अनुपम खेर यांचे कौतुक करत आहेत आणि असे म्हणत आहेत की, ईश्वर असा मित्र सर्वांना देवो. खरे तर, जिवलग मित्र सतीश कौशिकच्या जाण्यानंतर, अनुपम खेर आणि अनिल कपूर त्यांची मुलगी वंशिकाची पूर्ण काळजी घेत आहेत. वंशिकाला तिच्या वडिलांची कधीही कमतरता जाणवू नये अशी त्यांची इच्छा आहे.(Bollywood actor satish kaushik daughter vanshika makes reel with anupam kher watch)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबो! अभिनेत्यांपेक्षा जास्त आहे या गायकांचे मानधन, एका गाण्याची रक्कम ऐकून बसेल धक्का
विराट कोहलीने अनुष्कासोबत जिममध्ये केला डान्स; पाय माेडताच क्रिकेटरने केली आरडाओरड, व्हिडिओ व्हायरल