Thursday, July 18, 2024

रणबीरने ‘त्या’ कृतीने जिंकले राजामौलींचे मन, दिग्दर्शकांनीही अभिनेत्याला कडकडून मारली मिठी, एकदा पाहाच

अभिनेता रणबीर कपूर याला बाॅलिवूडचा ‘चाॅकलेट बाॅय’ म्हणून ओळखले जाते. मात्र, हा चॉकलेट बॉय आता त्याच्या आगामी सिनेमात वेगळ्याच रुपात दिसणार आहे. तो त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाच्या प्रमाेशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्य चित्रपटाच्या प्रमाेशनसाठी ‘ब्रह्मास्त्र’ची टीम हैदराबाद येथे पाेहोचली होती. यादरम्यान रणबीरने असे काही केले की, ज्याने ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक भावनिक झाले आणि त्यांनी अभिनेताला मिठी मारली. सोशल मीडियावर रणबीर आणि एसएस राजामौली यांचा हा व्हिडओ प्रचंड धुमाकूळ घालताेय. यावर युजर्स  वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. नेमके असे काय घडले या व्हिडिओत चला जाणून घेऊया…

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी (Viral Bhayani) याने रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये रणबीर काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. त्यात त्याने काळ्या रंगाची पँट, काळ्या रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाचे जॅकेट आणि काळ्या रंगाचे शूज परिधान केले आहे. यावेळी मंचावर रणबीर व्यतिरिक्त करण जोहर (Karan Johar), आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि मौनी रॉय (Mouni Roy) हेदेखील होते.

यावेळी रणबीरने सांगितले की, हा त्याच्या कारकीर्दीतला सर्वात माेठा चित्रपट आहे. यासाेबत त्याने पत्रकार परिषदेत सांगितले की, चित्रपटाचा दुसरा भाग येईपर्यंत ताे आपली तेलुगू भाषाही सुधरवणार आहे. यावर तेलुगू यूजर्सने रणबीरच्या या प्रयत्नासाठी प्रशंसा केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रणबीरचा हा अंदाज बघून चाहत्यांनी टाळ्या वाजवल्या. तसेच, एसएस राजामौली (SS Rajamouli) यांनी अभिनेत्याला थेट मिठी मारली. दुसरीकडे कार्यक्रमात आलिया भट्ट हिची प्रचंड चर्चा झाली. विशेषता तिचा ड्रेस जाे तिने कार्यक्रमदरम्यान घातला हाेता. आलियाने गुलाबी रंगाचा शरारा घातलेला, ज्यावर गोल्डन एंब्रॉयडरी हाेती. या ड्रेसवर गोल्डन एंब्रॉयडरीमध्ये LOVE लिहिले हाेते, तर मागे ‘Baby On Board’ लिहिले हाेते.

चित्रपटाविषयी बाेलायचे झाले, तर चित्रपट 9 सप्टेंबर राेजी चित्रपटगृहात प्रदर्शित हाेणार आहे. ज्यामध्ये पहिल्यांदा आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जाेडी बघायली मिळणार आहे. चित्रपटात आलिया- रणबीर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन, माैनी राॅय यांसारखे कलाकार दिसणार आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
रश्मिका करणार बिग बींसोबत काम, चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

अरेरे! एक दोन नव्हे, राजामौलींच्या ‘बाहुबली’मधील तब्बल 36 सीन चोरलेले? व्हायरल व्हिडिओमुळे खुलासा
सुकेश चंद्रशेखर प्रकरण नोराला चांगलंच भोवलं! ईओडब्ल्यूने केली ‘एवढे’ तास चौकशी

हे देखील वाचा