Tuesday, July 23, 2024

सुकेश चंद्रशेखर प्रकरण नोराला चांगलंच भोवलं! ईओडब्ल्यूने केली ‘एवढे’ तास चौकशी

सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandra Shekhar Case) प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्री निशाण्यावर असून अनेक अभिनेत्रींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. शुक्रवारी अभिनेत्री नोरा फतेहीची (Nora Fatehi) दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. सुकेश चंद्रशेखर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नोराची चौकशी करण्यात आली. एक नाही, दोन नाही, तर तब्बल सहा तास नोरा फतेहीची चौकशी सुरु होती. दरम्यान, यापूर्वी याप्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचीही चौकशी करण्यात आली होती.

सुकेश चंद्रशेखर प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीला शुक्रवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. काल सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नोराची याप्रकरणी चौकशी सुरु होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नोराचा जबाब नोंदवून घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज पडल्यास नोरा फतेहीला पुन्हा एकदा चौकशीला बोलावलं जाऊ शकतं.

प्रकरण नेमकं काय?
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) सोबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव (Jacqueline Fernandez) जोडले जात होते. त्यानंतर जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. पण आता याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले आहे.

सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर (bhumi Pednekar), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) सारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झालं आहे. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. काही अभिनेत्रींनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला तर काहींनी नाकारल्या होत्या.

महागडी घड्याळं आणि बरंच काही
याप्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचं नाव आलं होतं. त्यानंतर याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आलं. सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीनं एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेल्या एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश होता. ही सर्व माहिती ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली होती. पण आता जॅकलीनसह आणखी काही अभिनेत्रींनादेखील महागड्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलं आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘तू आई कधी होणार?’, चाहतीच्या प्रश्नावर संतापली हेमांगी कवी; म्हणाली, ‘हे असले प्रश्न…’
‘कार्तिकेय 2’ ची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, एकूण इतक्या कोटींचा जमवला गल्ला
‘जक्कल’ मराठी बेवसिरीज, पुण्यातील भीषण हत्याकांडाचा होणार उलघडा

हे देखील वाचा