बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांच्याकडे सध्या अनेक नव्या चित्रपटांची रांग लागली आहे. अमिताभ बच्चन यांना रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रत्येकजण नेहमीच उत्सुक असतो.बिग बींचे चाहते त्यांना ‘ब्रह्मास्त्र’मध्ये पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतानाच, या ज्येष्ठ अभिनेत्याने त्यांच्या आगामी ‘गुडबाय’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करून त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. या पोस्टरमध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) देखील झळकली आहे.
रश्मिका आणि बिग बी स्टारर ‘गुडबाय’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक आज रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते या संदर्भातील अपडेटची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रश्मिका मंदना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातून साऊथ क्वीन रश्मिका मंदना बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
नात्यांवर आधारित कथानक
अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये त्यांनी बेज रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. त्यावर त्यांनी निळ्या रंगाचे स्लीव्हलेस बॉम्बर जॅकेट परिधान केले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर एक छानसे हास्य आहे आणि ते पतंग उडवताना दिसत आहेत. तर, त्यांच्या मागे हिरव्या रंगाचा कुर्ता आणि दुपट्टा परिधान केलेली रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) हातात हातात फिरकी पकडून उभी असलेली दिसत आहे. या पोस्टरसोबत बिग बींनी छानसे कॅप्शन देखील लिहिले आहे. ‘परिवार का साथ है सबसे ख़ास, जब कोई नहीं होता पास, तब भी रहता है इनका एहसास #गुडबाय 7 ऑक्टोबर 2022 रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात रिलीज होत आहे! #GoodbyeOnOct7’, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
View this post on Instagram
‘बिग बीं’कडे चित्रपटांची रांग
‘गुडबाय’ चित्रपटाचे शूटिंग गेल्या वर्षी सुरू झाले होते. काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन यांचे सेटवरील पाळीव प्राण्यांसोबत खेळतानाचे फोटो व्हायरल झाले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदना यांच्याशिवाय नीना गुप्ता, एली अविराम, सुनील ग्रोवर, साहिल मेहता आणि पावेल गुलाटी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘गुडबाय’ हा चित्रपट 7 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ‘गुडबाय’ व्यतिरिक्त अमिताभ बच्चन अयान मुखर्जीच्या बहुप्रतिक्षित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये झळकणार आहेत. तर, ‘द इंटर्न’ या चित्रपटाच्या अधिकृत हिंदी रिमेकमध्ये देखील अमिताभ बच्चन दिसणार आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
हरनाज कौर संधूच्या ‘या’ व्हिडिओने प्रेक्षकांना केले बेधुंद, क्षणात व्हिडिओ व्हायरल
चित्रपट हिट होण्यासाठी काहीही! करण जोहरच्या ‘त्या’ कृतीची सोशल मीडियावर चर्चा , थेट मंचावरचं नागार्जुनचे…
‘दो हंसो का जोड़ा बिछड़ गयो रे…’ सिडनाजचा शेवटचा डान्स व्हिडिओ वायरल