Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

उर्फीच्या कपड्यांवर रणबीर कपूरचं माेठं वक्तव्य; म्हणाला, ‘अशा प्रकारच्या फॅशनचा…’

बाॅलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘तु झुटी मै मक्कार‘ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. अशात अलीकडेच अभिनेता करीना कपूरच्या ‘चॅट शो व्हॉट वुमन वॉन्ट‘मध्ये दिसला होता. यावेळी त्याने उर्फी जावेदच्या फॅशनवर प्रतिक्रिया दिली आहे. नेमके काय म्हणाला अभिनेता? चला जाणून घेऊया…

खरे तर, करीना कपूर (kareena kapoor) हिच्या मुलाखतीत एक गेम ठेवण्यात आला होता. यामध्ये अभिनेत्रीचा चेहरा लपवण्यात आला होता आणि रणबीर कपूर (ranbir kapoor) याला तिच्या नावावरून तिची फॅशनसेन्स कशी आहे, हे ओळखायचे होते. यावर रणबीर कपूरने आपले मत मांडले.

करीना कपूर उर्फी जावेदचा फोटो रणबीर कपूरला दाखवते आणि विचारते, ‘कोण आहे?’ यावर रणबीर कपूर म्हणतो, ‘ही उर्फी आहे का?’ यानंतर तो तिच्या स्टाईलला ‘बॅड टेस्ट’ म्हणतो. तो पुढे म्हणतो, ‘मी अशा प्रकारच्या फॅशनचा फार मोठा चाहता नाही, पण जेव्हा तुम्ही या जगात राहता, तेव्हा मला वाटते की, तुम्ही ज्यात कंमफर्ट आहे ते परिधान कले पाहिजे.’ यावर करीना कपूर त्याला विचारते, ‘गुड टेस्ट की बॅड टेस्ट.’ यावर रणबीर कपूर म्हणतो, ‘ही बॅड टेस्ट आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Mirchi Plus (@mirchiplus)

यावेळी रणबीर कपूर प्रियंका चोप्राच्या स्टाईलचे कौतुक करताना दिसला. तो म्हणाला, ‘मला वाटते की, ती खूप चांगले कपडे परिधान करते. तिच्यामध्ये खूप चांगला आत्मविश्वास आहे, जर तुमच्यात आत्मविश्वास असेल, तर तुम्ही काहीही करू शकता.’

दरम्यान, उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. ती अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींपेक्षा जास्त लक्ष वेधते. तिच्या चाहत्यांची मोठी यादी आहे. याचा उर्फी पुरेपूर फायदा घेते. ती अनेक प्रसंगी बोल्ड आणि हॉट ड्रेस परिधान करताना दिसली आहे.(bollywood actor ranbir kapoor on uorfi javed fashion style called it bad taste in kareena kapoor show see video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“अशी दाहकता बघण्याची लोकांची मानसिकताच नाही” प्रसाद ओकने व्यक्त केल्या ‘त्या’ फ्लॉप झालेल्या सिनेमाबद्दल भावना

केआरकेला ‘या’ अभिनेत्याला ‘ड्रग अॅडिक्ट’ म्हणणे पडले महागात, तक्रारीवरून कोर्टानं जारी केलं अटक वॉरंट

हे देखील वाचा