Sunday, June 2, 2024

आलिया भट्ट चांगली आई आहे की पत्नी? रणबीर कपूरच्या ‘या’ उत्तराने वेधले चाहत्यांचे लक्ष

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या त्याच्या ‘तू झुठी मैं मक्कर‘ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटातील अभिनेत्याच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत. रणबीरची श्रद्धा कपूरसोबतची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहांमध्ये शिट्ट्या वाजवत असताना, चाहत्यांना अभिनेता आणि आलियाची ऑन-स्क्रीन जोडी आवडली आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रणबीरला आलियासोबतच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला रणबीरने असे उत्तर दिले की, तिथे उपस्थित सर्वच थक्क झाली.

रणबीर कपूर (ranbir kapoor) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तू झुठी में मक्कर’ या चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या हृदयावर राज्य करत आहे. आपल्या चित्रपटामुळे चर्चेत असण्यासोबतच प्रमोशन दरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळेही हा अभिनेता चर्चेत आला आहे.

खरं तर, रणबीर त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तू झुठी मैं मकर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता, तेव्हा एका मुलाखतीत अभिनेत्याला विचारण्यात आले की, ‘आलिया भट्ट चांगली पत्नी आहे की आई?’ विचारलेल्या प्रश्नाला अभिनेत्याने अशा प्रकारे उत्तर दिले की, तिथे उपस्थित सर्वजण थक्क झाले. रणबीर म्हणाला, “ती दोन्ही पात्रे चांगल्या प्रकारे साकारते, पण माझ्या दृष्टिकोनातून मी म्हणेन की, ती एक चांगली आई आहे.”

रणबीर कपूरने 14 एप्रिल 2022 रोजी आलिया भट्टसोबत लग्न केले होते. दोघांनी आपापल्या कुटुंबीयांसह जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. यानंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी रणबीर आणि आलियाने लेक राहाचे स्वागते केले. रणबीर आणि आलिया आई-वडील झाल्यापासून आपापल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचा समतोल साधत आहेत.

रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता नुकताच श्रद्धा कपूरसोबत ‘तू झूठी मैं मक्कर’मध्ये दिसला होता. लव रंजन दिग्दर्शित हा चित्रपट 8 मार्च 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. यानंतर रणबीर संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना देखली आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित हाेईल.(bollywood actor ranbir kapoor tu jhoothi main makkar actor reveals if alia bhatt is a better wife or mother )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आरआरआर’ने ऑस्कर जिंकल्याचा आनंदात भारतीच्या मुलाने केला जल्लाेश, व्हिडिओ व्हायरल
2 वर्षात 100 ट्यून बनवल्या, पण 9 च सिलेक्ट झाल्या; चित्रपटातील गाणी आणि नृत्याने रचला इतिहास

हे देखील वाचा