Thursday, November 30, 2023

60 वर्षांचा रणबीर कसा खेळणार 20 वर्षाच्या लेकीबरोबर फुटबॉल? बोलून दाखवली ‘ही’ शोकांतिका…

बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट नुकतेच एका लहान मुलीचे पालक झाले आहेत. यावर्षी 6 नोव्हेंबरला दोघांनी त्यांच्या छोट्या परीचं स्वागत केलं. आलिया आणि रणबीरने मुलीचे सुंदर नाव ‘राहा’ ठेवले आहे. नव्या वडिलांच्या सहवासाचा आनंद घेण्याऐवजी रणबीरला तिची काळजी वाटत आहे. अभिनेत्याने अलीकडेच त्याच्या मुलीबद्दलची सर्वात मोठी भीती उघड केली आहे.

अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आयोजित रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा भाग बनला हाेता. तिथं बोलत असताना, अभिनेत्याने मुलगी राहा बद्दलची त्याची सर्वात मोठी चिंता प्रकट केली. अभिनेत्याने सांगितले की, “त्याला वाटते की, त्याने वडील होण्यास उशीर केला आहे. सध्या तो 40 वर्षांचा आहे, पण जेव्हा त्याची मुलगी 20 किंवा 21 वर्षांची होईल तेव्हा तो 60 वर्षांचा असेल. त्यावेळी तो आपल्या मुलीसोबत फुटबॉल खेळू शकेल का? तो तिच्यासोबत पळू शकेल का?” अशी चिंता रणबीरने व्यक्त केली.

जवळपास पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यावर्षी 14 एप्रिलला लग्नाच्या बेडीत अडकले. दोघांनीही त्यांच्या मुंबईतील घरी कोणताही थाटामाटात लग्न न करता साध्या पद्धतीनं लग्न केले. जिथे कुटुंबाव्यतिरिक्त फक्त काही खास मित्रांना बोलावण्यात आले होते. लग्नाच्या काही महिन्यांनंतर या जोडप्याने जूनमध्ये सोनोग्राफीचा फोटो शेअर करून प्रेग्नेंसीची घोषणा केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

रणबीर कपूर अखेरचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्टही मुख्य भूमिकेत होती. आता अभिनेता लवकरच लव रंजन दिग्दर्शित चित्रपटात दिसणार आहे, जो एक रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाशिवाय रणबीर लवकरच ‘पशु’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो ग्रे शेडच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वागा रेड्डी करत आहेत.(bollywood actor ranbir kapoor reveals his biggest insecurity regarding daughter raha kapoor when he become 60 year old)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
कॅटरिना अन् विकीनं व्यक्त केलं एकमेकांवरचं प्रेम; अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या प्रकाशाचा किरण…’

बॉलिवूडचा दबंग खान पुन्हा प्रेमात! ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीला करतोय डेट

हे देखील वाचा