Thursday, March 28, 2024

शाॅकिंग! रणबीर कपूर यापुढं नाही करणार एकही राेमॅंटिक चित्रपट, सांगितल ‘हे’ कारण

बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लाडका अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या ऑनस्क्रीन परफॉर्मन्सने वेळोवेळी त्याने लाखो लोकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. त्याचे राेमॅंटिक चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात. त्यामुळेच असे चित्रपट पाहण्याचा त्यांचा वेगळा चाहता वर्ग आहे. अभिनेता लवकरच एका रोमँटिक कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. जो या शैलीतील त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो. याचा खुलासा स्वत:ह रणबीर कपूर याने केला आहे.

रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) म्हणाला, “मला माहीत नाही, पण कदाचित हा माझा शेवटचा राेमॅंटिक काॅमेडी चित्रपट असेल कारण, मी म्हतारा झालाेय.” रणबीरच्या आगामी रोमँटिक चित्रपट लव रंजन दिग्दर्शित करत आहे. या चित्रपटात त्याची सहकलाकार श्रद्धा कपूर आहे. या चित्रपटाशिवाय रणबीर लवकरच ‘पशु’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो ग्रे शेडच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी करत आहेत.

या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना, अभिनेता म्हणाला की, “त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचे होते म्हणून त्याने ‘ऍनिमल’च्या स्क्रिप्टमुळे हा चित्रपट निवडला.” यासोबतच त्याने हे देखील सांगितले होते की, “तो त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल उत्साही आणि घाबरलेला आहे.” या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त अभिनेता अनिल कपूर आणि रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत आहेत.

रणबीर कपूरयाच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर रणबीर नुकताच ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 257.44 कोटींची दमदार कमाई केली. या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त आलिया भट्ट, मेगास्टार अमिताभ बच्चन,नागार्जुन, माेनी राॅय, शाहरूख खान यासारखे प्रसिद्ध कलाकार हाेते.(bollywood popular actor ranbir kapoor will not work in romantic comedy movies said i am getting older)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लग्नाच्या आधी सेक्स आणि प्रेग्नंसीवर दियाचे बेधडक वक्तव्य; म्हणाली, ‘हे सगळ्यांनाच जमत नाही…’

‘प्रेग्नंट होते म्हणून वैभवशी लग्न केलं नाही तर…’, दिया मिर्झाने सांगितले लग्न करण्याचे कारण

हे देखील वाचा