Monday, July 1, 2024

धक्कादायक! रणदीप हुड्डा याचा भीषण अपघात, रुग्णालयात केले दाखल

बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सध्या रणदीप हुड्डा मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आहे. रणदीप हुड्डा घोड्यावर स्वार होत असताना बेशुद्ध पडला आणि गंभीररित्या जखमी झाला. माध्यमातील वृत्तानुसार, ही घटना काही वेळापूर्वी रणदीपसोबत घडली, त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यांनतर डॉक्टरांनी अभिनेत्याला पूर्णपणे आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

रणदीप हुड्डा (randeep hooda) याला दुखापत होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्याला एकदा गुडघ्याला गंभीर दुखापत झाली हाेती. तर झाले असे की, गेल्या वर्षी रणदीप त्याच्या ‘राधे’ चित्रपटासाठी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसोबत ऍक्शन सीनचे शूटिंग करत होता. हा सीन शूट करताना रणदीपला दुखापत झाली. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली. आता पुन्हा एकदा रणदीप हुडा जखमी झाला आहे.

गेल्या वेळी रणदीप हुड्डाने त्याच्या शस्त्रक्रियेची आणि आरोग्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती आणि हॉस्पिटलमधील त्याचे काही फोटोही शेअर केले होते. अशातच पुन्हा एकदा रणदीप हुड्डाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर झाले असे की, घोड्यावरून पडल्यामुळे रणदीपच्या गुडघ्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागू शकते, असे बोलले जात आहे.

रणदीप हुडाने त्याच्या ‘कॅट’ या वेब सीरिजमध्ये दमदार अभिनय सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. दुसरीकडे त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर तो साई कबीरच्या ‘मर्द’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी 6 मे रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय तो इलियाना डिक्रूजसोबत ‘अनफेअर अँड लव्हली’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बलविंदर सिंग जंजुआ यांनी केले आहे. यासोबतच रणदीप ‘रॅट ऑन अ हायवे’ आणि ‘स्वतंत्र वीर सावरकर’ या चित्रपटांमध्येही काम करणार आहे.(bollywood actor randeep hooda seriously injured fainted while horse riding)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘फोर मोअर शॉट्स’ फेम मानवीने केला साखरपुडा, प्रसिद्ध कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मालिकेत लवकरच होणार ‘या’ नवीन पात्राची एन्ट्री

हे देखील वाचा