Friday, July 12, 2024

अच्छा ! तर ही आहे रणदीप हुड्डाची गर्लफ्रेंड? सोशल मीडियावरून फोटोने माजवली खळबळ

आपल्या दमदार अभिनय आणि प्रत्येक भूमिकेसाठी घेतलेली जिवतोड मेहनत यामुळेच अभिनेता रणदीप हुड्डाला (Randeep Hudda) बॉलिवूड जगतातील प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जाते. रणदीप हुड्डा आता कितीही बोला की त्याचे आयुष्य म्हणजे ‘त्याचा सेट, चित्रपट आणि पात्र’ आहेत, परंतु आता कोणी खोटे बोलू शकत नाही की अभिनेत्याच्या आयुष्यात एक खास व्यक्ती आहे. लिन लैशरामसोबतच्या नात्यामुळे अभिनेता बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतेच असे काही घडले ज्यानंतर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब लागला आहे.

रणदीप हुड्डाची गर्लफ्रेंड लिन लैशराम (Lin Laishram) ही मणिपूरची प्रसिद्ध मॉडेल आहे. याशिवाय तिने रंगून, ओम शांती ओम यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. लिन प्रियांका चोप्राच्या मेरी कॉम या चित्रपटातही दिसली आहे. लिन ही राष्ट्रीय स्तरावरील अँकर देखील राहिली आहे. इतकंच नाही तर ती नसीरुद्दीन शाह यांच्या थिएटर ग्रुपचा भागही आहे. लिनने मिस नॉर्थ ईस्ट सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात ती पहिली उपविजेती होती.

 

View this post on Instagram

 

रणदीप हुड्डाने अलीकडेच लिन लैश्रारामसोबतचे काही फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. ही फोटो दिवाळीच्या मुहूर्तावर घेतली आहे, समोर आलेल्या फोटोंमध्ये लिन आणि रणदीप पारंपरिक पोशाखात दिसत आहेत. पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये रणदीप अतिशय एलिगंट वाटतोय. तर लिन हिरव्या रंगाच्या साडीमध्ये सुंदर दिसत आहे. त्याच्या या पोस्टनंतर, अभिनेता लिनसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली. तसेच, माध्यमाच्या वृत्तानुसार, अभिनेता 2016 पासून लिन लैश्रारामला डेट करत आहे. 2018 मध्ये ते पहिल्यांदा एकत्र दिसले होते. दोघे लिव्ह-इनमध्ये असल्याचेही सांगण्यात आले होते. अभिनेत्याने लिन आणि तिच्या पालकांसोबतचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आई-वडिलांची ओळख करून दिल्यानंतर आता रणदीप लवकरच त्याच्या लग्नाची बातमी देणार असे म्हटले जात आहे.

सोशल मीडियावर फोटो समोर आल्यानंतर चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. कपलचा फोटो पाहिल्यानंतर रणदीपचे चाहते खूप खूश झाले आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले, ‘तुम्ही असेच आनंदी रहा.’ यावर कमेंट करताना दुसरा यूजर म्हणाला, ‘रणदीप भाई ही वहिनी आहे का?’ या जोडप्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नोव्हेंबर ठरणार हाऊसफुल, ‘या’ धमाकेदार वेब सिरीज होणार प्रदर्शित

रूह बाबा होणार ‘खूनी डेंटिस्ट’, कार्तिक आर्यनचा ‘फ्रेडी’मधील फर्स्ट लूक व्हायरल

हे देखील वाचा