बच्चन कुटुंब सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत आहे. अभिषेक बच्चन याच्या टीम पिंक पँथरने प्रो कबड्डी लीगच्या सीझन 9 ची ट्रॉफी जिंकली. अभिषेक आणि ऐश्वर्याने आपल्या मुलीसोबत हा विजय साजरा केला. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. शनिवारी (दि. 17 डिसेंबर)ला हा सामना पार पडला. रणवीर सिंग फिफा विश्वचषकासाठी रवाना होण्यापूर्वी सामना पाहण्यासाठी आला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्यासोबत दिसत आहे.
प्रो कबड्डी लीगमध्ये अभिषेक बच्चनला ( abhishek bachchan ) सपोर्ट करण्यासाठी ऐश्वर्या (aishwarya rai bachchan ) आणि आराध्या आल्या हाेत्या. या सामन्यात रणवीर सिंगही (ranveer singh) उपस्थितीत हाेता. कबड्डी लीगमध्ये ऐश्वर्याने आणि रणवीरसोबत खूप मजा केली. रणवीर सिंगचा ऐश्वर्या राय आणि आराध्यासोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल आहे. चाहते या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहे.
Ranveer and Aishwarya Rai Bachchan yesterday at kabaddi final????#RanveerSingh pic.twitter.com/FdsYaHkuew
— fatiim (@fatiim_9RS) December 18, 2022
व्हायरल व्हिडिओमध्ये रणवीर सिंग ऐश्वर्या आणि आराध्याजवळ बसून त्यांच्या बोलण्याने इम्प्रेस करताना दिसत आहे. ऐश्वर्यालाही त्याचे बाेलणे आवडते आणि तिला आपले हसू आवरता आलं नाही. रणवीर ऐश्वर्याच्या हाताचे चुंबन घेतो आणि त्या बदल्यात ऐश्वर्या गंमतीशीर पणे त्याचे नाक ओढते. यादरम्यान, आराध्या हसताना आणि दोघांकडे प्रेमाने बघताना दिसली. मात्र, व्हिडीओमध्ये अभिनेता ऐश्वर्याशी बोलत असल्याने त्याचा चेहरा दिसत नाही. ऐश्वर्या आणि आराध्यासोबत अभिषेक बच्चन आणि नव्या नवेली नंदा देखील येथे उपस्थित हाेते. मात्र, त्यांचे लक्ष कबड्डीवर होते.
प्रो कबड्डी लीगनंतर तो फिफा वर्ल्ड कप पाहण्यासाठी गेला यावरून रणवीर सिंगच्या एनर्जीचा अंदाज लावता येतो. यावेळी त्यांच्यासोबत दीपिका पदुकोणही उपस्थित होती. रणवीर सिंगने भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत फिफा वर्ल्ड कपमधील व्हिडिओ शेअर केला आहे. नेहमी मस्तीच्या मूडमध्ये असणाऱ्या रणवीर सिंगने इथेही तीच स्टाइल कायम ठेवली. त्यांनी रवी शास्त्रींचे चुंबन घेतले आणि दोघेही गाताना दिसले. (bollywood actor ranveer singh kisses actress aishwarya rai bachchan hand at pro kabaddi league in mumbai)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
वय फक्त आकडा! आजीबाईंनी 93व्या वर्षी लावले ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ गाण्यावर ठुमके, पाहा व्हिडिओ
आनंदवार्ता! अक्षय कुमार साकारणार लिओनेल मेस्सीची भूमिका?