रविवारी (दि. 18 डिसेंबर)ला जगाच्या नजरा फिफा विश्वचषकावर खिळल्या होत्या. यावेळी विश्वचषक कोणाला मिळणार हे सर्वांनाच जाणून घ्यायचे होते. लाइव्ह मॅच पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भारतीय सेलिब्रिटीही पोहोचले होते. अखेर या शानदार सामन्याचे विजेतेपद अर्जेंटिनाने पटकावले आहे. तसेच, लिओनेल मेस्सीचा हा शेवटचा विश्वचषक होता जो संस्मरणीय ठरला. या वर्ल्डअपमधील मेस्सीचा विजय अक्षय कुमार याच्यासाठी चेष्टेचा विषय ठरला आहे.
फिफा वर्ल्ड कपचा शेवटचा सामना रविवारी (दि. 18 डिसेंबर)ला रात्री झाला आणि पहाट होताच अक्षय कुमार (akshay kumar ) याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला, ज्यामध्ये युजर्सनी त्याला लिओनेल मेस्सीच्या बायोपिकचा हिरो म्हणून वर्णन केले. काही ठिकाणी अक्षय कुमारचा चेहरा मेस्सीच्या फाेटाेवर लावण्यात आला होता. हा बायोपिक अक्षय कुमारपेक्षा चांगल कोणीही करू शकनार नाही, असे अनेकांचे मत आहे. काही ठिकाणी त्याच्या ‘हाऊसफुल’ चित्रपटाचे दृश्यही व्हायरल हाेत आहे.
#Messi???? #FIFAWorldCup #AkshayKumar pic.twitter.com/F23Cu19pi7
— jai_memeisthan (@memeisthan) December 19, 2022
अक्षय कुमार गेल्या काही वर्षांपासून मोठ्या योद्धा, वास्तविक जीवनातील हिराे यांच्यावर बायोपिक करत आहे. अलीकडेच तो सम्राट पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत दिसला होता. मात्र, हा चित्रपट चांगलाच फ्लॉप ठरला. नुकताच त्याने छत्रपती शिवाजीचा एक प्रोमो शेअर केला आहे. या चित्रपटाच्या प्रोमोसाठी अक्षय कुमार चांगलाच ट्राेल झाला हाेता. आता अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटांची खिल्ली उडवत, सोशल मीडियावर मेस्सीच्या लूकमधील अक्षयचे फोटो शेअर करून अभिनेत्याची खिल्ली उडवली जात आहे.
Akshay Kumar announced a biopic on Messi. Starts preparations. pic.twitter.com/6Qajs7VfdH
— Zaffar ???????? (@Zaffar_Nama) December 19, 2022
काही मीम्समध्ये अक्षय कुमार मैदानात फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूच्या भूमिकेत दिसत आहे. युजर्स अभिनेत्याची खिल्ली उडवत आहेत आणि त्याने मेस्सीची भूमिका करावी असा आग्रह करत आहेत. मात्र, खिलाडी कुमारने याबाबत मौन बाळगले आहे. चाहत्याला त्यांच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे. दुसरीकडे, अभिनेत्याला एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये पाहण्याची प्रतीक्षा सुरू आहे. (bollywood actor akshay kumar in messi biopic after argentina wins world cup)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अरे तुमच्या ताटात जेवण नाहीये…’, शाहरुखच्या ‘पठाण’ला ट्रोल करणाऱ्यांवर बरसली प्रसिद्ध अभिनेत्री
भल्याभल्यांनी केले ट्रोल, पण दीपिका राहिली हिमालयासारखी उभी; फीफा विश्वचषकात उंचावली भारतीयांची मान