Wednesday, June 26, 2024

रणवीरने भर मुलाखतीत दीपिकाला केले किस, अभिनेत्री लाजून झाली लाल, व्हिडिओ व्हायरल

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही साेशल मीडियावर एकमेकांसाठी प्रेमळ पोस्ट शेअर करतात. अशातच पुन्हा एकदा रणवीर सिंग असंच काहीसं करताना दिसला आहे. खरं तर, अलीकडेच दीपिका पदुकोणने टाइम मॅग्झिनची शाेभा वाढवून इंटरनॅशनल पातळीवर आपली छाप साेडली, ज्यामुळे लाेकाना तिचा खूप अभिमान वाटत आहे. चाहतेच नव्हे तर, पती आणि अभिनेता रणवीर सिंगही तिच्या या कामगिरीवर खुप खूश आहे.

टाइम मॅगझिनच्या कव्हर फाेटाेवर दीपिका दिसल्यानंतर रणवीरने आपल्या इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे कौतुक करत एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने सांगितले की, ‘मला माझ्या बेबी गर्लवर अभिमान आहे.’ इतकंच नव्हे तर,अभिनेत्याने मॅगझिनच्या एक BTS व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये रणवीर-दीपिकाचे काही गाेंडस क्षण आहेत. या क्षणांमध्ये एक क्षण असा आहे, जेव्हा रणवीर अचानकपणे अभिनेत्रीला किस करताे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

या व्हिडिओमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण मुलाखत देताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, मुलाखतकाराने तिला लग्नाबद्दल विचारले असता त्याच क्षणी रणवीरने अचानक दीपिकाला किस केले, ज्याची अपेक्षा अभिनेत्रीला अजिबात नव्हती. दोघांचा हा प्रेमळ क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून चाहते त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काहीजण रणवीरला बेस्ट पती म्हणत आहेत, तर कुणी दोघांना बेस्ट कपल म्हणत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by RANVEERIAN ✨❤️ (@ranveeriannn)

दीपिका पदुकाेणच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर दीपिका शेवटची शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत ‘पठाण’मध्ये दिसली होती. अशात आता अभिनेत्री सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फाइटर’मध्ये ऋतिक रोशनसोबत दिसणार आहे. एवढेच नाही तर तिच्याकडे ‘प्रोजेक्ट के’ देखील आहे, ज्यामध्ये ती प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे.(bollywood actor ranveer singh reacts on deepika padukone time magazines cover photo he feels proud on his wife kissed actress)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तरुण भारत तयार होतो’ टाईम मासिकावर झळकल्यानंतर दीपिका पदुकोणचे भारताबद्दलचे ‘ते’ व्यक्तव्य चर्चेत

TMKOC “सेटवर पुरुष मक्तेदारीसारखे…” म्हणत अभिनेत्री जेनिफरने निर्मात्यांवर लावलेल्या आरोपांवर भिडे सरांची प्रतिक्रया

हे देखील वाचा