Saturday, March 2, 2024

नेटकऱ्यांनी रणवीर सिंगची उडवली खिल्ली; कमेंट करत म्हणाले, ‘ओव्हर अॅक्टिंगसाठी 50 रुपये…’

रणवीर सिंगच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होत असते. इतकंच नाही, तर त्याची एनर्जी आणि कायम एक्टिव राहण्याची पद्धतही खूप कौतुकास्पद आहे. पण रणवीर सिंगचा ड्रेसिंग सेन्स असा आहे, ज्यासाठी त्याला अनेकदा सोशल मीडियावर टार्गेट केले गेले आहे. रणवीर सिंग अनेकदा खूप वेगळ्या आणि विचित्र कपड्यांमध्ये दिसला आहे. अशात रणवीर एका कार्यक्रमात पोहोचला आणि तेथे असे काही घडले, ज्याने अभिनेता पुन्हा एकादा चर्चेत आला आहे.

खरं तर, रणवीर सिंग (ranveer singh) काल संध्याकाळी म्हणजेच साेमवारी (20मार्च)राेजी एका सलूनच्या लाँचिंगला पोहोचला होता. यावेळी तो राखाडी रंगाची पँट आणि काळ्या टी-शर्टमध्ये दिसला. याशिवाय त्याने त्याच्या डोळ्यांवर काळा चष्माही लावला हाेता. अशात रणवीर सिंग जसा पॅपराझींसमाेर पाेहचला तसे त्याला ग्रीन कार्पेटवर काही कचरा दिसला आणि त्याने लगेच ताे कचरा उचलला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

होय, कचरा पाहून रणवीरकडून राहावल्या गेले नाही आणि त्यांनी कॅमेरासमाेर झूकुन स्वच्छता करायाला सुरुवात केली. रणवीरने तिथे पडलेला कचरा उचलला आणि पुढे निघाला.

अशात आता रणवीर सिंगच्या या व्हिडिओवर चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘भारतातील रस्त्यांवर खूप कचरा आहे… तो कधीच उचलला गेला नाही.’, तर दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिले की, ‘ओव्हरअॅक्टिंगसाठी 50 रुपये कट’. अशात व्हिडिओ पाहून एका युजरने दीपिकाचा उल्लेख छेडला आणि म्हटले, ‘दीपिका पदुकोण खूप साफसफाई करते. तिने अनेकवेळा खुलासा केला आहे की, ती तिचे घर खूप स्वच्छ ठेवते.. अशात आता कदाचित हा त्यांच्या जीवनशैलीचा भाग झाला असेल.” अशाप्रकारे चाहते व्हिडिओवर भिन्नभिन्न कमेंट करत अभिनेत्याला ट्राेल करत आहेत. (ranveer singh picks up trash at event netizens says 50 rupai kaat over acting ke)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हिंदुत्व खोट्यावर आधारित’ हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला अटक

सलमान खान पडला पूजाच्या प्रेमात, ‘किसी का भाई किसी की जान’चे नवीन गाणे रिलीज, एकदा पाहाच

हे देखील वाचा