Monday, July 1, 2024

‘ज्या प्रेमात वेड नाही ते प्रेम नाही…’, जेव्हा करिना कपूर मराठीमध्ये बाेलते

बाॅलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया हिचा ‘वेड’ हा मराठी चित्रपट गेल्या वर्षी शुक्रवारी (30 डिसेंबर)ला प्रदर्शित झाला, रितेशने दिग्दर्शित केलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. जिनिलिया या चित्रपटाची निर्माती असून तिचा हा पहिला मराठी चित्रपट आहे. अशातच रितेशने त्याच्या अधिकृत इंस्टग्रामवर त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जाे साेशल मीडियावर येताच तुफान व्हायरल हाेत आहे. काय आहे नेमकं या व्हिडिओमध्ये? चला जाणून घेऊया…

या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख (riteish deshmukh ) याच्यासाेबत बाॅलिवूड अभिनेत्री करिना कपूर ( kareena kapoor) दिसत आहे. महत्वाचे म्हणजे या व्हिडिओमध्ये करिना कपूर अभिनेत्यासाेबत चक्क मराठीमध्ये बाेलत आहे. अभिनेता करिनाला विचारताे की,”तुझ्यासाठी ‘वेड’ म्हणजे काय?” यावर अभिनेत्री म्हणते, “वेड म्हणजेच तुझा सिनेमा, प्रेमात एक नशा आहे, ज्या प्रेमात वेड नाही, ते प्रेम नाही.” तसेच करिना रितेशला या चित्रपटासाठी शुभेच्छाही देताना दिसते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

‘वेड’ या चित्रपटात रितेश-जिनिलिया व्यतिरिक्त अभिनेते अशोक सराफ, जिया शंकर, शुभंकर तावडे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. तर अभिनेता सलमान खान या चित्रपटात कॅमिओ करणार आहे. वेड हा चित्रपट वर्षाच्या शेवटच्या दिवशी प्रदर्शित झाल्यानं चित्रपटाचे सगळे शाे हाऊसफुल आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 3.50 कोटींची दमदार कमाई करत महाराष्ट्रातील टाॅप 5 दमदार ओपनिंग करणाऱ्या मराठी सिनेमांच्या यादीत पाचवं स्थान मिळवले आहे.

रितेश देशमुखच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर त्याने ‘तेरी मेरी कसम’, ‘ग्रॅंड मस्ती’, ‘धमाल’ या सारख्या दमादार चित्रपटात काम केले आहे.(bollywood actor riteish deshmukh share video with kareena kapoor on ved marathi movie)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
अक्षया आणि हार्दिक यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण, गोव्याला जाऊन केले फोटो शेअर
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने वच्या 43 व्या वर्षी दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, थाटामाटात पार पडला लग्नसोहळा

हे देखील वाचा