Sunday, May 19, 2024

अभिनेता रितेश देशमुखला का मागावी लागली पत्रकारांची माफी? कारण जाणून घेतलंच पाहिजे

बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीमधील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घालणारा प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख. पुन्हा एकदा ‘वेड‘ या नवीन चित्रपटामुळे खूपच चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या ‘बेसुरी‘ आणि ‘वेड‘ गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. वेड चित्रपटामध्ये रितेश आणि जिनेलिया देशमुख यांची जोडी पन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अशातच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान रितेश आणि जिनेलिया यांच्या कोल्हापुर पत्रकार परिषदेत पत्रकारांनासोबंत गैर वर्तवणुक झाल्याचे समोर आलं आहे.

लोकप्रिय कपल जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) आणि रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांचा नवीन चित्रपट वेड (Ved) लवकरच प्रेक्षकांना वेड लावण्यास तयार झाला आहे. नुंकतच हे जोडपं कोल्हापुरमध्ये महालक्ष्मीचे दर्शनास गेले होते, तेव्हा दर्शन झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधत असताना काही पत्रकारांनी त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तवणुकीमुळे रितेश आणि जिनेलियावर संताप व्यक्त करत म्हणाले होते की, “आम्हाला निमंत्रण नव्हतं हे मान्य आहे, पण आम्हाला माहित नव्हतं की, इथे मोजक्याच लोकांना बोलू दिलं जाणार आहे, आणि आमच्या पाठीमागे बाउन्सर लावून हॉटेलामधून बाहेर हाकललं. आमचा अवमान झाला आहे. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यत पोहोचवणं गरजेचं होतं.”

पत्रकारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर रितेशने देशमुखने मोठ्या मनाने सगळ्या पत्रकारांची माफी मागितली आणि तो म्हाणाला की, “तुम्हाला असं वाटत असेल की, आमच्याकडून तुमचा अवमान झाला आहे, तर मी तुमची माफी मागतो. आम्ही कोणाशी भेटणार हे आम्ही ठरवलं नव्हतं. तुमच्या भावना माझ्यापर्यत पोहोचल्या त्यामुळे मी तुमची माफी मागतो.”

रितेश पुढे म्हणाला की, “मी इथे चित्रपटासाठी किंवा प्रमोशनसाठी आलो नव्हतो.माझ्या लग्नाला 11 वर्ष पुर्ण झाली, पण आम्ही दर्शनाला आलो नव्हतो. आम्ही देवी दर्शनासाठी आलो आहोत. ही जागा नाहीये चित्रपटाविषयी बोलण्यची. तुमच्यावर महालक्ष्मीचा असावा हिच महालाक्ष्मीचरणी प्रार्थना.” रितेश देशमुख आणि जिनेलियाचा वेड चित्रपट (दि, 30 डिसेंबर 2022) रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षांवर भाष्य करणारा ‘मुसंडी’ चित्रपट ‘या’ दिवशी होतोय प्रदर्शित
अभिनेत्री जयसुधानं मांडली दु:खद व्यथा; म्हणाली, ‘कंगना रणाैतला पद्मश्री अन् आमच्याकडे दुर्लक्ष…’

हे देखील वाचा