Monday, April 15, 2024

मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी रितेश देशमुख पोहोचला जामियाला, अभिनेत्याचा ‘ताे’ व्हिडिओ लीक

अभिनेता रितेश देशमुख सेंट्रल युनिव्हर्सिटी जामिया मिलिया इस्लामियामध्ये शूटिंग करताना स्पॉट झाला. अशात शूटिंगदरम्यानचे अभिनेत्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ज्यामुळे अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाचा लूकही सोशल मीडियावर लीक झाला आहे.

सोशल मीडियावर लीक झालेला व्हिडिओमध्ये अभिनेता रितेश देशमुख (riteish deshmukh) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिपार्टमेंटच्या बाहेर उभे असल्याचे दिसत आहे. यासाेबतच तिथे अनेक पाेलिस देखील उपस्थित आहे. यादरम्यान काही मुलीही हातात चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन उभ्या आहेत. व्हिडिओमध्ये अभिनेत्याने सामान्य माणसाप्रमाणे शर्ट पँट परिधान केला आहे. यासोबतच रितेशने ऑफिस बॅगही खांद्यावर घेतलेली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश देशमुख दिल्लीतील सेंट्रल युनिव्हर्सिटी जामिया मिलिया इस्लामियामध्ये त्याच्या आगामी मराठी चित्रपटाचे शूटिंग करत असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, या चित्रपटाचे चित्रीकरण विद्यापीठातील विविध विभागात झाल्याचे समोर आले. वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगसाठी सेटअप तयार करण्यात आला होता.

riteish deshmukhविद्यापीठात चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान इंजिनीअरिंग डिपार्टमेंटचे रुपांतर मेडिकल डिपार्टमेंटमध्ये करण्यात आले. डिपार्टमेंटच्या बाहेर मेडिसिन अथॉरिटी ऑफ इंडियाचे हेट क्वार्टर यांचा बाेर्ड लावण्यात आला. या साेबतच डिपार्टमेंट बाहेर अनेक व्हॅनिटी व्हॅनही उभ्या होत्या.

इंजिनीअरिंग डिपार्टमेंटबरोबरच सेंट्रल लायब्ररीमध्येही शूटिंगसाठी सेटअप ठेवण्यात आला होता. चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, रितेश देशमुखच्या चित्रपटाचे शूटिंग बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे.(bollywood actor riteish deshmukh spot in jamia millia islamia shooting set up in central university )

अधिक वाचा-
वडील-मुलीच्या नात्यातील भावनिक बंध उलगडणारा ‘बापमाणूस’ चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित हाेणार सिनेमागृहात

प्रेग्नेंसीदरम्यान वाढत्या वजनामुळे इलियानाची झाली ‘अशी’ अवस्था; म्हणाली, ‘डॉक्टरांकडे जाऊनही फायदा नाही…’

हे देखील वाचा