बॉलिवूडचं नाही तर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणून रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या जोडीचे नाव घेतले जाते. अतिशय गोड आणि क्युट कपल म्हणून त्यांची खरी ओळख आहे. ते दोघं नेहमीच त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून कपल गोल्स देताना दिसतात. रितेश आणि जिनिलिया बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर आहेत. मात्र रितेशने मराठीमध्ये देखील काम करत अनेक चांगले सिनेमे केले आहे. रितेशने मागच्यावर्षी दिग्दर्शनात देखील उडी मारली आणि ‘वेड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
त्यांचा ‘वेड’ हा चित्रपाट नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट तुफान गाजला. यादरम्यान दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या व्हिडिओवर चाहते भन्नाट कमेंट करत असतात. त्यांच्या पोस्टवर चाहते लाईकचा पाऊसच पाडत असतात.
सध्या रितेश आणि जिनिलियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रितेश सेटवर बसलेला दिसत आहे. त्यावेळी एक मेकअप आर्टिस्ट रितेशचा मेकअप करत आहे. त्याचवेळी रितेश फोनवर बोलत आहे. त्याच्यासोबत कोणीतरी महिला बोलत आहे. त्या दोघांमधील झालेला संवाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
फोनवर ती महिला रितेशची विचारपुस करत आहे. ती म्हणाली की, तुझी कामावरुन सुट्टी झाली का नाही? तुला घरचा रस्ता दिसतो की नाही. पटकण घराकडे निघा. नाहीतर आल्यावर बघावं लागेल. हा व्हिडिओमुळे रितेशने शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहीले की, “लग्न झाल्यानंतर…”.
View this post on Instagram
त्याच्या या व्हिडिओवर चाहते खूप कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करताना लिहीले की, एका वाघाची शिकार एका हरणीने केली, तुम्हाला पण वहिनी दम देतात का?, भाऊ माझी पण अशीच हालत आहे. तसेच दुसऱ्याने लिहीले की, जिनिलीया वहिनींचा दरारा आहे. त्याचा हा व्हिडिओ खुप धुमाकुळ घालत आहे. (Fans said after seeing Ritesh Deshmukh’s ‘To’ video)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माेठी बातमी! दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्याचे कार अपघातात निधन, दारूच्या नशेच चालवत हाेता गाडी
‘एंडलेस समर’, तेजस्वी प्रकाशची ‘ती’ पाेस्ट चर्चेत