Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आमच्या बेडरुमपर्यंत…’, सैफ पॅपराझींवर संतापत म्हणाला असं काही की, करीनाही बघतच बसली

बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार जोडपे सैफ अली खान आणि करीना कपूर खान पार्ट्या आणि पब्लिक इवेंट्सपासून शक्यतो दूर राहतात. दोन्ही प्रसिद्ध कलाकार कायमच सांगतात की, ते शक्य तितके फिल्म इंडस्ट्रीतील पार्टी कल्चरपासून दूर राहणे पसंत करतात आणि त्यांच्या घरात आरामात राहणे पसंत करतात. मात्र, अनेकदा हे जोडपे त्यांच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसह कार्यक्रम आणि पार्ट्यांमध्ये सहभागी होताना दिसतात.

गुरुवारी (दि.2 मार्च)ला रात्री दाेन्ही स्टार्स त्यांच्या जवळची मैत्रिणी मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांची आई जॉयस यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाले. यावेळी हे दाेन्ही स्टार जोडपे हातात हात घालून जाताना दिसले. ज्यामध्ये नेहमीप्रमाणे, करीना कपूर खान (kareena kapoor khan) आणि सैफ अली खान (saif ali khan) ब्लॅक आउटफिट परिधान केलेले दिसले. मेटॅलिक अलंकार असलेल्या काळ्या ड्रेसमध्ये बेबो ग्लॅमरस दिसत होती, तर सैफ पांढरा पायजमा आणि काळ्या कुर्तामध्ये देखणा दिसत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by ETimes (@etimes)

सैफ अली खान, करीना कपूर आणि त्यांची मुले तैमूर अली खान, जेह अली खान हे पॅपराझींचे आवडते आहेत. हे जोडपे नेहमी आनंदाने फाेटाेंसाठी पोज देतात, पण काल रात्री असे काही घडले जे पाहून सर्वच थक्क झाले. तर झाले असे की, पॅपराझी सैफला पाेज देण्यासाठी मागे लागला, ज्यावर सैफ म्हणाला, “एक काम करा, आमच्या बेडरूममध्ये या.” या उत्तरावर करीना हसली.

सैफ अली खानच्या वर्क फ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेता लवकरच ‘आदिपुरुष’ मध्ये दिसणार आहे, ज्यात तो रावणाची भूमिका साकारत आहे. दुसरीकडे, करीनाच्या वर्क फ्रंटविषयी बाेलायचे झाले, तर ती ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’मध्ये दिसणार आहे. याासेबतच करीना लवकरच तब्बू आणि क्रिती सेननसोबत ‘द क्रू’च्या शूटिंगलाही सुरुवात करणार आहे. (bollywood actor saif ali khan got angry on paparazzi says bedroom tak aa jaaiye kareena kapoor smiles)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जया बच्चन पॅपराझींसाेबत दिसल्या मस्ती करताना; पाेज देत म्हणाल्या, ‘बघा मी किती…’

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीने केला नवाजवर मोठा आरोप, मध्यरात्री मुलांसह काढले तिला घराबाहेर

हे देखील वाचा