Saturday, September 7, 2024
Home बॉलीवूड आयडी न दाखवता करण जोहरने विमानतळावर केला प्रवेश, सुरक्षा रक्षकाने रोखल्यानंतर ट्रोल झाला दिग्दर्शक

आयडी न दाखवता करण जोहरने विमानतळावर केला प्रवेश, सुरक्षा रक्षकाने रोखल्यानंतर ट्रोल झाला दिग्दर्शक

करण जोहरचा फॅशन सेन्स नेहमीच लोकांना त्याच्याकडे आकर्षित करतो. विशेषत: त्याचा एअरपोर्ट लूक, ज्यामुळे तो अनेकदा ट्रोल होतो. अशात अलीकडेच करण पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात विमानतळावर पोहोचला. पण यावेळी करण त्याच्या लूकमुळे नाही, तर त्याच्या वागण्यामुळे ट्राेल झाला. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

करण जोहर (karan johar) या व्हायरल व्हिडिओमध्ये थोडा घाई – घाईत जाताना दिसत आहे. करण विमानतळावर पोहोचताच आयडी चेक न करता तणावात गेटमधून आत जाऊ लागताे. अशात सिक्योरिटी त्याला कागदपत्रे दाखवण्यासाठी थांबवते, ज्यानंतर त्याला डफल बॅगेतून पेपर काढायला वेळ लागताे. या कारणावरुन साेशल मीडिया युजर्स करण जाेहरचा चांगलाच क्लास घेत आहेत आणि त्याला ट्राेल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

करण जाेहरला साेशल मीडिया युजर्सने केले ट्राेल
करण जाेहरच्या या शैलीने साेशल मीडिया युजर्स थक्क आहेत. एका युजर्सने कमेंट करत सांगितले की, ‘या सेलिब्रिटींना वाटते की, त्यांना सुरक्षा तपासणीची गरजच नाही. यांना नियमांचे पालन करणे आवश्यक वाटत नाही.’, तर एक युजर्स कमेंट करत म्हणताे, ‘करण कॅटवॉक करण्यात इतका व्यस्त होता की, तो पेपर दाखवायला विसरला.’ अशात एकाने कमेंट करत लिहिले की, ‘त्याने इतका मोठा चष्मा घातला होता की, त्याला काहीही दिसत नव्हते.’ करणने पांढरे सैल जाकीट आणि बॅगी ब्लॅक ट्राउझर्स घातले होते, ज्यामध्ये ताे नेहमीप्रमाणे युनिक दिसत हाेता.(filmmaker karan johar tries to enter airport without showing id security stopped him)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रालेटची स्ट्रिप हाताळत संजीदा शेखने बनवला बाेल्ड व्हिडिओ, अभिनेत्रीची अदा पाहून चाहते थक्क

नेटकऱ्यांनी रणवीर सिंगची उडवली खिल्ली; कमेंट करत म्हणाले, ‘ओव्हर अॅक्टिंगसाठी 50 रुपये…’

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा