Wednesday, July 3, 2024

सलमान खान का घालताे फाटलेले बूट? ‘या’ कलाकारांनी केला धक्कादायक खुलासा, वाचा संपुर्ण प्रकरण

बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटाच्या प्रमाेशमध्ये व्यस्त आहे. ईदच्या मुहूर्तावर 21 एप्रिलला सलमानचा हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटातून त्याच्यासोबत शहनाज गिल आणि पलक तिवारी डेब्यू करणार आहेत. याशिवाय या चित्रपटात खूप मोठी स्टारकास्ट आहे. सलमान खानसह सर्व स्टार्स या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. यादरम्यान पलक तिवारी आणि अभिनेता जस्सी गिल यांनी सलमानच्या आयुष्याशी संबंधित एक मजेदार किस्सा सांगितला आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

सलमान खान (salman khan) हा हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता आहे, पण तुम्हाला माहित आहे का की, एवढा मोठा स्टार होऊनही सलमान फाटलेले बूट घालतो. याचा खुलासा सलमानच्या चित्रपटातील स्टार्स पलक तिवारी आणि जस्सी गिल यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, “सलमान खान एवढा मोठा स्टार असला तरी खऱ्या आयुष्यात तो खूप डाउन टू अर्थ आहे. त्यांना माहित आहे की, लाेकांशी कसे ट्रीट केले पाहिजे.”

पलक आणि जस्सी पुढे म्हणाले की, “सलमान खान आमच्याशी इतका फ्रेंडली आहे की, आम्हाला कधीच वाटत नाही की आम्ही सेटवर इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वासोबत काम करतोय.” जस्सी गिलने असेही सांगितले की, “कधी कधी सलमान खान फक्त चप्पल आणि शॉर्ट्स घालून सेटवर येतो.” त्यानंतर पलक तिवारीनेही त्यांच्या शूजचा उल्लेख केला.

पलकने सांगितले की, “तो एवढा मोठा स्टार आहे, इतका पैसा आहे पण तरीही कधी कधी ताे फाटलेले बुट घालताे. यावर जस्सी गिल पुढे म्हणाला की, “ताे नेहमी लेदरचे शूज घालतो आणि ते देखील कधी कधी फाटलेले असतात.” यावर सलमान खानचे म्हणणे आहे की, ‘त्याला या शूजमध्ये खूप आरामदायक वाटते.’

‘किसी का भाई किसी की जान’ बद्दल बाेलायचे झाले, तर हा चित्रपट फरहाद सामजी यांच्या दिग्दर्शनाखाली बनला असून ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित हाेणार आहे. सलमान खान आणि पलक तिवारी यांच्याशिवाय या चित्रपटात पूजा हेगडे, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, भूमिका चावला आणि विजेंदर सिंग यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. (bollywood actor salman khan shoes have holes reveals palak tiwari and jassi gill)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
परिणीती चोप्राने राघव चढ्ढासोबत लग्नाच्या बातमीवर अखेर साेडले माैन; म्हणाली, ‘माझं वैयक्तिक आयुष्य…’

गॉर्जियस शेहनाज गिलचे स्टनिंग फोटोशूट व्हायरल, एकदा पाहाच

हे देखील वाचा