‘बिग बॉस 16‘च्या शुक्रवार लेटेस्ट एपिसाेडमध्ये लोहरी आणि मकर संक्रांती स्पेशल होता. शोमध्ये भारती सिंग पती हर्ष लिंबाचियासोबत बिग बाॅसच्या घरात आली. यावेळी भारतीने कुटुंबातील सदस्यांना लोहरी आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यासाेबतच काही मजेदार खेळही खेळली.
तर झाले असे की, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांनी घरातील सदस्यांना पिंक आणि येलाे रंगाच्या दोन ग्रुपमध्ये विभागले. पहिला गेम टीम पिंकने जिंकला, ज्यात एमसी स्टॅन, साजिद खान, अब्दू रोजिक, निम्रीत कौर अहलुवालिया, सुंबुल टौकीर आणि शिव ठाकरे यांचा समावेश होता. तर दुसऱ्या टीममध्ये टीना दत्ता, शालीन भानोत, प्रियांका चौधरी, अर्चना गौतम, श्रीजिता डे आणि सौंदर्या शर्मा यांचा समावेश होता. अशात यलो टीम दुसरी फेरी जिंकली, तर तिसऱ्या फेरीत बराेबरची स्पर्धा पाहायला मिळाली आणि पुन्हा टीम पिंकने बाजी मारली. टीम पिंकने हा सामना 2-1 असा जिंकला. मजेशीर खेळानंतर सलमान खान घरातील सदस्यांशी बोलला आणि त्यांना लोहरीच्या शुभेच्छा दिल्यात.
View this post on Instagram
त्यानंतर भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया सलमान खानसोबत मस्ती करू लागले. अशात भारती सिंगने सलमानला गेल्या वर्षी केलेल्या वचनाची आठवण करून दिली. गेल्या वर्षी जेव्हा भारती ‘बिग बॉस 15’ मध्ये आली होती, तेव्हा ती प्रेग्नेंट होती आणि सलमानने तिच्या मुलाला गोलाला लाँच करण्याचे वचन दिले होते. त्यामुळे, भारती तिच्या मुलाला घेऊन आली आणि सलमानने त्याला आपल्या मिठीत घेतले.
जेव्हा सलमान खानने गोलाचे नाव विचारले तेव्हा हर्षने त्याचे नाव ‘लक्ष्य’ असल्याचे सांगितले. सलमानने गोलाला आपल्या जवळ घेऊन डान्स केला. यादरम्यान, भारती आणि हर्षने सलमानसोबत खूप धमाल केली. शेवटी भारती सिंग काही कागद घेऊन आली, ज्यावर ती गोलासाठी ऑटोग्राफ घेणार हाेती. मात्र, या कागदपत्रांच्या मधोमध तिने सलमानच्या पनवेल फार्महाऊसच्या मालमत्तेची कागदपत्रेही ठेवली, ज्यावर सलमानने सही केली.
जेव्हा सलमान खानने कागदावर सही केली, तेव्हा भारती म्हणाली, “आता पनवेलचे फार्म हाऊस गोलाच्या नावावर करण्यात आले आहे. आता तुम्ही हवं तेव्हा येऊ शकता, पण तुम्हाला येण्याआधी फोन करावा लागेल.” खरे तर भारतीने ज्या कागदावर त्याची सही घेतली होती, त्यावर ‘पनवेलचा प्रॉपर्टी पेपर’ असे मजेशीरपणे लिहिले होते. या सगळ्या हशामध्ये सलमानने गोलाला खास भेट दिली.
सलमान खानने गोलाला त्याचे सिग्नेचर स्टाइल ब्रेसलेट भेट दिले. भारतीने ही भेट प्रेक्षकांसमोर दाखवली.(bollywood actor salman khan sign panvel farmhouse property to bharti singh son gola aka laskshya give bracelate at bigg boss 16 haarsh limbaachiya)
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राखी सावंत अन् आदिलचा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल; लोक म्हणाले, ‘इस्लामची राजकुमारी’
सुश्मिता सेनचे मित्र आणि आयपीएलचे संस्थापक ललित मोदी ऑक्सिजन सपोर्टवर