Sunday, April 14, 2024

अर्पिताने सलमानच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली भावूक पाेस्ट; म्हणाली, ‘तुमच्यासारखे अमेझिंग लाेक…’

सलमान खानचे त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. बहीण अर्पिता खान आणि तिच्या मुलांवर ताे खूप प्रेम करताे. अर्पिताच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी सलमान एकही संधी सोडत नाही, अशा परिस्थितीत अर्पितालाही तिचं प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळाली आणि तिनं भावाच्या वाढदिवसानिमित्त ग्रँड पार्टीचे आयोजन केले. इतकंच नाही, तर अर्पिताने सलमानसाठी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्टही लिहिली. काय आहे त्या पाेस्टमध्ये? चला जाणून घेऊया…

सलमान खान (salman khan) अनेकदा पनवेल फार्म हाऊसवर त्याच्या वाढदिवसाची पार्टी होस्ट करतो, पण यावेळी अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी ग्रँड पार्टी होस्ट केली. अर्पिताने पार्टीचा फोटो शेअर करून भावावरचे प्रेम व्यक्त केले, तेव्हा बॅकग्राउंडला कार्तिक आर्यनही दिसला. सलमान आपल्या बहिणीला मिठी मारून पोज देत असताना, कार्तिक अगदी मागेच कोणाशी तरी मजेशीरपणे बोलत असल्याचे दिसत आहे.

अर्पिता खानने पार्टीचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या लाईफ लाइनला वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुमच्यासारखे अमेझिंग लोक आता मिळत नाहीत. सदैव उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद भाऊ. मी तुझ्यावर प्रेम करते.”

अर्पिता खानने इन्स्टाग्राम स्टोरीवर पार्टीतील पाहुण्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फाेटाेत बहीण अलविरा देखील दिसत आहे. या शानदार पार्टीसाठी अनेक लोक अर्पिताचे कौतुक करत आहेत आणि तिचे आभार मानत आहेत.

salman khan birthday party
Photo Courtesy: Instagram/arpitakhansharma

अर्पिता खान आणि आयुष शर्माच्या या पार्टीत कार्तिक आर्यन, संगीता बिजलानी, सुनील शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, तब्बू, युलिया वंतूर, रितेश देशमुख, जेनेलिया डिसूजा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. या पार्टीत सलमानची फॅमिली ब्लॅक आणि ब्लू कलरच्या आउटफिट्समध्ये दिसली. सलमानच्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, संगीता बिजलानीची सर्वाधिक चर्चा होत आहे.

अभिनेत्याच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सलमानच्या ‘टायगर 3’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.(bollywood actor salman khan sister arpita khan says happiest birthday to my life line )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जरा इकडे पाहा! पॅपराझींनी रश्मिकावर केल्या अश्या काही कमेंट की, अभिनेत्री लाजून झाली लाल

मुकेश खन्ना यांनी तुनिषा शर्माच्या कुटुंबावर काढला राग; म्हणाले, ‘सर्वात मोठे दोषी मुलींचे…’

हे देखील वाचा