Sunday, April 26, 2026
Home बॉलीवूड शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा हिने एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिच्यासोबत सलमान खान देखील आहे. हा थ्रोबॅक फोटो अर्पिताच्या लग्नाच्या दरम्यानचा आहे. फोटो शेअर करताना अर्पिताने स्वत: ला नशीबवान असल्याचे सांगितले. यासह तिने भाऊ व बहिणी यांच्यातील प्रेमाच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत.

या फोटोत सलमान खानने केवळ पांढर्‍या रंगाची धोती परिधान केली आहे. सलमान क्लीन शेव्हमध्ये देखणा दिसत आहे. यात अर्पिताही खूपच सुंदर दिसत आहे. तिचे केस खुले आहेत. अर्पिता खानने फ्लोरल प्रिंटसह क्रीम कलरची साडी परिधान केली आहे, ज्यावर भरतकाम केलेले आहे. या फोटोत दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

हे फोटो शेअर करत अर्पिताने लिहिले की, “सुखद आठवणी.” यासोबतच तिने लग्नाबद्दल उत्सुकता आणि भावावर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितले. अर्पिताने नोव्हेंबर 2014 साली अभिनेता आयुष शर्मासोबत लग्न केले होते. त्यांना आता एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

अर्पिता खान त्यांच्या कुटुंबातील सर्वात धाकटी आहे. ती लाईमलाईटपासून दूर राहते. सलमान खान बर्‍याचदा तिची मुलं अहिल आणि आयत यांच्याबरोबर खेळताना दिसतो. त्यांचे व्हिडिओही तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. अर्पिताचा पती आयुष शर्मा एक चांगला अभिनेता आहे. त्याने ‘लवयात्री’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाने चांगली कामगिरी केली नाही, परंतु चित्रपटातील गाणी मात्र सुपरहिट झाली.

आयुष शर्मा आता सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. दोघेही ‘अंतिम’ या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. नुकताच त्याचा टिझरही रिलीझ झाला आहे. यात सलमान आणि आयुष यांची दुश्मनी दाखविली आहे. सलमान हा पोलिस असून आयुष या चित्रपटात गँगस्टर आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-केजीएफ स्टार यश प्रेमळ बापाच्या भूमिकेत; बाप- लेकाच्या व्हिडिओला मिळतंय चाहत्यांकडून अफाट प्रेम

-पद्मिनी कोल्हापुरेच्या मुलाच्या लग्नात श्रद्धाचे जोरदार ठुमके, व्हिडिओ पाहून थिरकतील तुमचेही पाय

-‘मी त्याला अनेकदा मरताना पाहिलंय…’, सुशांतच्या आठवणीत दिग्दर्शक भावुक, व्हिडिओ केला शेअर

हे देखील वाचा