सलमान खान 57 वर्षांचा झाला असला तरी आजही तो आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत त्याच पद्धतीने राहतो ज्याप्रमाणे तो त्याच्या लहानपणी राहत असे. 27 डिसेंबरला सलमानने त्याचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. सलमान खानच्या बर्थडे पार्टीला अनेक स्टार्स आले होते. सलमानकडे पाहून असे वाटते की जणू त्याच्यासाठी वय हा केवळ एक आकडा आहे. वयाच्या या टप्प्यावरही सलमानचा स्वॅग पूर्णपणे वेगळा आहे. सलमान आजही दमदार भूमिका साकारू शकताे.
सध्या सलमान (salman khan) त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यासोबतच त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपटही लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे सलमानला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशातच अलीकडे सलमानने त्याच्या एका मुलाखतीत खुलासा केला की, ‘तो आजही त्याच्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या तितकाच जवळ आहे जितका तो लहानपणी होता.’
अलीकडेच, माध्यमाना दिलेल्या एका मुलाखतीत सलमानने सांगितले की, “आजही माझे सर्व बालपणीचे मित्र माझ्या खूप जवळ आहेत.” आपले मत मांडताना सलमान पुढे म्हणाला की, “माझे मित्र 40-45 वर्षांपासून माझ्यासोबत आहेत. आजही त्यांना मला सर्व काही सांगण्याचा अधिकार आहे. मी लहानपणी जसा राहत होताे तसच आजही मी माझ्या मित्रांसाेबत राहताे. वयाच्या या टप्प्यावर येऊनही माझे बहिण – भाऊ लहानपणाप्रमाणेच माझ्यासोबत राहतात.”
सलमानने नुकत्याच केलेल्या संभाषणात सांगितले की, “आजही त्याच्या वडिलांना त्यांना वाटेल तेव्हा मारण्याचा अधिकार आहे.” बॉलीवूडवर राज्य करणार सलमान खान पुढे म्हणाला की, “आजही त्यांची आई जेव्हा तिला वाटेल तेव्हा त्याला चापट मारू शकते.”
सलमान लवकरच शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एक कॅमिओ करत आहे. याशिवाय त्याचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट 2023ला ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे आणि दिवाळीला तो ‘टायगर 3’ मध्येही दिसणार आहे. (bollywood actor salman khan turned 57 said mother can slap whenever she wants)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्यांना बेधुंद करणारा तेजश्रीचा हॉट लूक, फोटो पाहून काळजात वाजेल घंटी
वर्षभरात चित्रपटांचा पाऊस पडला, पण ‘या’ सिनेमांवर बनवले गेले सर्वाधिक मीम्स; एक नजर टाकाच