Sunday, May 19, 2024

वर्षभरात चित्रपटांचा पाऊस पडला, पण ‘या’ सिनेमांवर बनवले गेले सर्वाधिक मीम्स; एक नजर टाकाच

सण 2022मध्ये हिंदी सिनेसृष्टीत अशा काही घटना घडल्या, ज्यामुळे अनेक मीम्स बनवून चित्रपट आणि कलाकारांना ट्रोल करण्यात आले. मीम्सच्या निर्मात्यांनी रणबीर कपूर, आलिया भट्ट, सैफ अली खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे मीम्सद्वारे क्लास घेतले आणि त्याचा आनंद घेतला. वर्षाच्या शेवटच्या दिवसात आम्ही तुम्हालाही अशाच काही मजेदार मीम्सची आठवण करून देत आहोत, जे पाहून तुम्हीही तुमचे हसवणे थांबवू शकणार नाही.

वर्षाच्या सुरुवातीपासूनच चित्रपटांबद्दल आणि त्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या पात्रांबद्दल लोकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. या वेडेपणामुळे लोक इतके क्रिएटिव्ह झाले की, त्यांनी त्यांच्या आवडत्या स्टार्सना मीम्स बनवून ट्रोल करायला सुरुवात केली.

saif ali khan

मीम्स बनवणं आणि ट्रोल होणं यात सैफ अली खानचं नाव सगळ्यात आधी येतं. ऑगस्टमध्ये आलेल्या या चित्रपटाच्या टीझरवर बरीच टीका झाली होती, त्याहीपेक्षा सैफ अली खानच्या लूकवर. या चित्रपटात सैफने रावणाची भूमिका साकारली. सैफचे रावणाचे पात्र खूपच स्टायलिश दिसत होते. इथे त्याच्या हेअर स्टाइलवर बनवलेला मीम दाखवला आहे. मात्र, त्याच्या लूकवर इतर कारणांनीही टीका झाली होती.

panchayat
panchayat

त्याचबरोबर ‘पंचायत 2’ या वेबसिरीजमधील ‘देख रहा है बिनोद’ देखील प्रेक्षकांमध्ये चांगलेच लोकप्रिय झाले. सर्वसामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत त्यांच्या वक्तव्यांवर आणि सोशल मीडिया पोस्टवर ‘देख रहा है बिनोद’चा वापर करू लागले.

aamir khan

आमिर खानचा ‘लाल सिंग चढ्ढा’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट होता, पण हा चित्रपट दुर्दैवाने फ्लाॅप झाला. त्याच्या रनिंग सीनसह अनेक व्हिज्युअल आणि डायलॉगवर मीम्स बनवले गेले हाेते, पण लाेकांनी त्याच्या ट्रेनमध्ये गोल गप्पा खातानाच्या सीनवर जास्त मीम्स बनवले आणि त्याची मजा घेतली.

ranbir kapoor

‘ब्रह्मास्त्र’बाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेली चर्चा यंदा संपुष्टात आली. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, पण मीम्सच्या निर्मात्यांनी या चित्रपटाला देखील साेडले नाही. या मीम्समध्ये रणबीर कपूर त्याच्या आगीसोबतच्या नात्याबद्दल बोलत आहे, ज्यावर लोकांनी भरभरुन आनंद घेतला.

ranveer singh

यावर्षी रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट चांगलेच व्हायरल झाले होते. रणवीर सिंगच्या फोटोशूटवर अश्नीर ग्रोव्हरची प्रतिक्रिया येथे आहे. (year ender best memes 2022 saif ali khan, ravan look, aadipurush  photos ranveer singh nude photoshoot)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हे’ 5 बाॅलिवूड स्टार्स 2023 मध्ये अडकणार लग्न बंधनात, कियारापासून अनेक बड्या कलाकारांचा यादीत समावेश

बेशरम रंग ते ठुमकेश्वरी, ‘ही’ 5 ट्रेंडिंग गाणी आहेत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी योग्य

हे देखील वाचा