अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा बॉलिवूडचा सर्वात यशस्वी कलाकार म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि दमदार लूकने त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटात सलमान खान असला तर चित्रपट हिट होणारच असे समीकरणच सिने जगतात तयार झाले आहे. ज्याचे श्रेय सलमान खानच्या अफाट लोकप्रियतेला दिले जाते. परंतु असे असले तरी सलमान खान वेळेच्या बाबतीत मात्र खूपच हलगर्जी असून सेटवर वेळेत न येणाऱ्या कलाकारांच्या यादीत त्याचाही समावेश होतो. पण अभिनेता सलमान खाननेच याबद्दलचे कारण सांगितले होते ज्यामुळे तो सेटवर उशिरा येतो. काय आहे हे कारण चला जाणून घेऊ.
शुटिंगसाठी चित्रपटांच्या सेटवर उशिरा येण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कलाकारांमध्ये प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या सलमानचेही नाव घेतले जाते. दबंग खानच्या उशिरा येण्याचा खुलासा त्याची अत्यंत जवळची मैत्रीण मानली जाणारी अभिनेत्री कॅटरिना कैफने केला होता. कॅटरिना एकदा सलमानच्या बिग बॉस शोमध्ये सहभागी झाली होती, जिथे तिने सलमानच्या या सवयीबद्दल सांगितले होते. गेल्या वर्षी बिग बॉस 15 मध्ये करीना कपूरसोबत दिग्दर्शक रोहित शेट्टीही पोहोचला होता.
शो दरम्यान, कॅटरिना कैफ रोहित शेट्टीला सांगताना दिसते की सलमान चित्रपटाच्या शूटिंगसाठी उशीरा यायचा. यावर सलमान खाननेही हा आरोप मान्य केला. कॅटरिनाने सलमानला गाणे गाण्याची इच्छा व्यक्त केली जी सलमाननेही तात्काळ पूर्ण केली. दरम्यान अभिनेता सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या मैत्रीची बॉलिवूड जगतात चांगलीच चर्चा रंगली होती. एक था टायगर, टायगर जिंदा है अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये दोघांनी काम केले आहे.(katrina kaif talks about salman khan lateness on film set)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अन्न तू नाही अल्लाह देतो’, जेव्हा सर्वांसमोर सलमान खानवर चिडल्या होत्या कोरिओग्राफर सरोज खान
‘या’ अभिनेत्यामुळे कॅटरिना कैफने दिलेला का सलमान खान डच्चू?