Monday, July 1, 2024

सिद्धार्थच्या वडिलांची प्रकृती स्थिरावली; लग्नसोहळा पुन्हा थाटामाटात सुरू

बाॅलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या आयुष्यात तो क्षण आला आहे, ज्याची दोघेही आतुरतेने वाट पाहत होते. आता थोड्याच वेळात या जोडप्याच्या लग्नाचे विधी सुरू होणार आहेत. लेटेस्ट अपडेटनुसार, घोडी आणि बँड बाजा तयार आहे. थोड्याच वेळात अभिनेता सिद्धार्थ घोडीवर बसणार असून वरात थाटामाटात निघणार आहे. जैसलमेरच्या सूर्यगढ़ पॅलेसच्या आत, वरात डान्स करताना वधू कियाराला घेण्यासाठी पोहोचेल. सूर्यगढ पॅलेसमध्ये यावेळी लग्नाची रंगत वाढताना दिसत असून या जोडप्याच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता दिसत आहे.

दुसरीकडे, काल (दि. 6 फेब्रुवारी)ला रात्री पार्टीदरम्यान सिद्धार्थच्या वडिलांची तब्येत बिघडल्याची बातमी आली हाेती. अशा स्थितीत पार्टी काही वेळ थांबवावी लागली. सध्या जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये बरीच हालचाल पाहायला मिळत आहे. कियारा (kiara advani) आणि सिद्धार्थ (sidharth malhotra) याच्या लग्नाचा शुभ मुहूर्त 3 ​​वाजता आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अशा परिस्थितीत आता थोड्याच वेळात सिद्धार्थ वरात घेऊन कुटुंबासह निघणार आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांचे स्पतपदी पॅलेसच्या बावडी स्थळी होईल, ज्यानंतर रात्री 8 वाजता स्वागत समारंभ होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मुंबईच्या ग्रँड पार्टीत दिग्गज मंडळी हाेणार सहभागी
लग्नानंतर सूर्यगड पॅलेसमध्ये मोठी पार्टी होणार आहे. त्याचबरोबर लग्नानंतर दिल्लीत रिसेप्शनही ठेवण्यात आले आहे. दिल्लीतील रिसेप्शननंतर सिद्धार्थ आणि कियारा 10 फेब्रुवारीला मुंबईत पोहोचतील. यानंतर 12 फेब्रुवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन होणार आहे, ज्यामध्ये सिने जगतातील सर्व दिग्गज मंडळी सहभागी होणार आहेत.(bollywood actor sidharth malhotra father not well kiara advani wedding latest update baraat band baja ready saat phere will take place at 3pm)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
राखी सावंतच्या तक्रारीवरून आदिल दुर्राणीला अटक, ड्रामा क्वीनने ऑडिओ जारी करून केली पुष्टी

काय सांगता! करण जोहरमुळे रोनित रॉयला नाकारावा लागला ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाचा हॉलिवूड सिनेमा

हे देखील वाचा