Saturday, June 15, 2024

राखी सावंतच्या तक्रारीवरून आदिल दुर्राणीला अटक, ड्रामा क्वीनने ऑडिओ जारी करून केली पुष्टी

ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. अशातच आता राखी पती आदिल दुर्रानीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच राखीने पती आदिलवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरचे आरोप केले होते, त्यासाेबतच आता तिने त्याच्यावर पैसे आणि दागिने चोरीसह अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. सोमवारी (दि. 6 फेब्रुवारी)ला अभिनेत्रीने आदिलविरुद्ध मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अशा परिस्थितीत आता पोलिसांनी आदिलला अटक केली असून, याला दुजोरा देत अभिनेत्रीने हा ऑडिओ जारी केला आहे.

राखी सावंत (rakhi sawant) हिने आदिल (adil durrani ) याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखीने सांगितले होते की, “जेव्हापासून ती बिग बॉस मराठीमध्ये गेली होती, तेव्हापासून आदिलचे कोणाशी तरी एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर आहेत आणि तिच्याकडे मुलीचे फोटोही आहेत.” यासोबतच राखीने आरोप केला आहे की, “आदिलमुळे तिच्या आईवर योग्य उपचार होऊ शकले नाहीत.” राखीचे म्हणणे आहे की, “आदिल आज (दि. 7 फेब्रुवारी)ला तिला मारण्यासाठी घरी आला होता.” त्याने फोन केला आणि सांगितले की, ‘त्याला तिला एक-दोन मिनिटे भेटायचे आहे’. राखीने नकार दिल्यानंतरही तो आला, त्यामुळे राखीने पोलिसांना कळवले आणि आदिलला अटक करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

राखी सावंतने आदिलवर तिचा छळ केल्याचा आणि तिचा वापर केल्याचा आरोप केला आहे. आदिलला अटक करण्यात आली असून तीही स्थानकावर पोहोचत असल्याचे राखी सावंतने एक निवेदन जारी केले आहे. राखीने सांगितले की, “आदिल खान दुर्रानी मला माझ्या घरी भेटायला आला होता, जिथून त्याला अटक करण्यात आली आहे. हे माध्यम किंवा नाटक नाही. यामुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. त्यांनी मला मारहाण केली, माझे पैसे लुटले, कुराणावर हात ठेवूनही माझी फसवणूक केली. सत्याचे समर्थन करा, मी सर्व पुरावे दिले आहेत.”

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

त्याचवेळी आदिल दुर्राणीचा पोलिस स्टेशनच्या बाहेरचा व्हिडिओही समोर आला आहे. पोलीस आदिलला ओशिवरा पोलीस ठाण्यात घेऊन जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

राखी आणि आदिलने गेल्या वर्षी गुपचूप लग्न केले होते, ज्याचा खुलासा नुकताच अभिनेत्रीने मॅरिज सर्टिफिकेट शेअर करून केला होता. तेव्हापासून राखीने अनेकवेळा आदिलवर आरोप केले आहेत. मात्र, आता हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे.(dramaqueen rakhi sawant files a complaint against husband adil durrani alleging that he has taken her money and jewellery)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ऐश्वर्यावाला सुंदरतेमध्ये मात देणारी ‘सिर्फ तुम’ फेम अभिनेत्री आहे तरी कुठे? जाणून घ्याच

अरे हिला आवरा…! काल पतीवर लावला चोरीचा आरोप अन् आज हॉटेलात…

हे देखील वाचा