Monday, July 1, 2024

लग्नानंतरही मंगळसुत्र अन् सिंदूरमध्ये दिसली नाही अथिया; युजर्स म्हणाले, ‘हिचे नक्की लग्न… ‘

बाॅलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लाडकी लेक अथिया शेट्टी 23 जानेवारी रोजी तिचा प्रियकर आणि क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्नबंधनात अडकली. दोघांनी अभिनेत्याच्या खंडाळा फार्महाऊसवर सात फेऱ्या घेतल्या. अशातच आता अथिया शेट्टी मुंबईत एका ठिकाणी स्पाॅट झाली, ज्याचा व्हिडिओ पॅपराझींने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडिओ समाेर येताच साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीला माेठ्या प्रमाणात ट्राेल करू लागले. काय आहे याच्या मागचे कारण? चला जाणून घेऊया…

अथिया (athiya shetty) हिला तिच्या साध्या लूकमुळे युजर्स ट्रोल करत आहेत. सिंदूर न लावता, मंगळसूत्र न घालता नवीन नवरी घराबाहेर कशी फिरते, असा प्रश्न साेशल मीडिया युजर्सला पडला आहे. पॅपराझींनी अथियाचा हा व्हिडिओ  सलूनबाहेर घेतला आहे. कारमध्ये बसण्यापूर्वी अथियाने फोटोग्राफर्सना पोज दिली. यावेळी अभिनेत्रीने डेनिमवर क्रॉप टॉप घातला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. मेकअपशिवायही अथिया खूप सुंदर दिसत आहे, परंतु सिंदूर न लावल्याने युजर्स तिला ट्राेल करत आहेत.

लोक व्हिडिओवर कमेंट करून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, ‘तिचे कपडे कसे आहेत, तिचे लग्न झाले आहे की नाही?’, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिले की, ‘कोण म्हणेल, ‘तिचे नुकतेच लग्न झाले आहे?’, हे कोणते नवीन लग्न आहे?’ अशात अथियाचा चाहता कमेंट करत म्हणाला, ‘हे तिचे आयुष्य आहे. या कपड्यांमध्ये ती कम्फर्ट आहे. तीला जज करणारे आपण कोणी नाही. आपल्या कामात लक्ष द्या.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

30 वर्षीय अथियाने ‘हीरो’, ‘मुबारकान’ आणि ‘मोतीचूर चकनाचूर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. (bollywood actor suniel shetty daughter athiya spotted without mangalsutra and sindoor who married kl rahul recently netizens trolled brutally viral video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपट ‘या’ तारखेला हाेणार प्रदर्शित

राजकुमार हिरानी बनवणार लाला अमरनाथांचा बायाेपिक, ‘खिलाडी’ अक्षय दिसणार मुख्य भूमिकेत?

हे देखील वाचा