Sunday, May 19, 2024

‘मला माझ्या मुलांना विशेष…’, सुनील शेट्टीला त्याच्या मुलांना भारतात का नाही शिकवावं वाटलं? अभिनेता म्हणाला…

बाॅलिवूड अभिनेता सुनील शेट्टीला दोन मुलं आहेत. अशात आता अभिनेत्याने आपल्या मुलांना भारताच्या कॉलेजमध्ये शिक्षण का दिले नाही याचा खुलासा केला आहे. आपल्या मुलांना अमेरिकेतील शाळेत पाठवण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागले आणि कठोर परिश्रम देखील घ्यावे लागले, असेही या अभिनेत्याने उघड केले.

अभिनेता सुनील शेट्टी (suniel shetty) याने 1992मध्ये आलेल्या ‘बलवान’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र, त्याला सर्वाधिक लोकप्रियता ‘मोहरा’ चित्रपटातून मिळाली. अशात अभिनेता शेवटचा अॅमेझॉन मिनी टीव्ही सीरिज ‘टूटेगा नहीं, तोड़ेगा’मध्ये दिसला होता. या सगळ्यात अभिनेत्याला त्याचे सुरुवातीचे दिवस आठवले आणि त्याने त्याच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल खुलासा केला.

करिअरच्या सुरुवातीला सुनील शेट्टीला खूप संघर्ष करावा लागल्याचे त्याने सांगितले. यामागचे कारण म्हणजे चित्रपट समीक्षक त्याच्या चित्रपटांना खूप वाईट रेटिंग देत असत. त्यामुळे त्याच्यावरच नव्हे, तर कुटुंबावरही त्याचा परिणाम झाला. यावर खुलासा करताना सुनील शेट्टी म्हणाला, “माझ्या मुलांना भारतीय शाळेत न पाठवण्याचा माझा निश्चय होता. मला त्यांना अमेरिकन बोर्डाच्या शाळेत पाठवायचे होते. मला अमेरिकन फॅकल्टी हवी होती. यामागचे कारण हे होते की, मला माझ्या मुलांना विशेष वाटावे असे वाटत नव्हते. मला त्यांना अशा जगात वाढवायचं होतं जिथे ते कोण आहेत याने काही फरक पडत नाही. मला आठवतंय की माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की, खूप पैसे लागतील.”

मुलाखतीदरम्यान सुनील शेट्टीने असेही सांगितले की, “त्याने आपल्या मुलांना अभिनेता होण्यासाठी कधीही प्रेरित केले नाही.” खरे तर, अभिनेत्याने अथियाला अटलांटा येथील एका महाविद्यालयात प्रवेश दिला होता, परंतु तिने तेथे शिक्षण घेण्यास नकार दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

अथिया शेट्टी हिच्या अभिनय काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर तिने ‘हिराे’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती ‘मोतीचूर चकनाचूर’, ’मुबारकन’ यासारख्या चित्रपटात दिसली. (bollywood actor suniel shetty explains why son ahaan and daughter athiya did not study in indian schools )

अधिक वाचा- 
काय सांगता! कॅटरिनाने शाहरुखला किस करण्यासाठी केली हाेती बळजबरी? अभिनेत्यानं स्वत:च केला खुलासा
‘बिग बॉस 16’ मधील स्पर्धक श्रीजिता डे अडकली लग्न बंधनात, प्रियकरासाेबत दिल्या रोमँटिक पाेज

हे देखील वाचा