Sunday, May 19, 2024

‘बिग बॉस 16’ मधील स्पर्धक श्रीजिता डे अडकली लग्न बंधनात, प्रियकरासाेबत दिल्या रोमँटिक पाेज

अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 16‘ ची स्पर्धक श्रीजिता डे 1 जुलै रोजी जर्मनीमध्ये तिचा प्रियकर मायकल ब्लोहम-पेपसोबत विवाह बंधनात अडकली. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर लग्नाचे फोटो शेअर करून तिच्या लग्नाची अधिकृत घोषणा केली. रविवारी (1 जुलै)ला श्रीजीताने तिच्या चर्चमधील लग्नाचे तीन फोटो शेअर केले, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

लग्नामध्ये अभिनेत्री श्रीजिता डे (sreejita de)ही पांढऱ्या ब्राइडल गाऊनमध्ये सुंदर दिसत आहे, तर मायकेल काळ्या सूटमध्ये देखना दिसत आहे. कुटुंबातील सदस्य आणि मोजक्या मित्रांच्या उपस्थितीत दोघांनी एकमेकांशी लग्न केले. अशात श्रीजीता हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे फोटो शेअर केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज आम्ही हातात हात टाकून कायमची सुरुवात साजरी करत आहाेत.”

अभिनेत्रीने पोस्ट टाकताच, अनेक अभिनेते आणि तिच्या बिग बॉसच्या हाउसमेट्सने तिला नवीन सुरुवातीसाठी अभिनंदन करायला सुरुवात केली. अर्चना गौतमने लिहिले, “अभिनंदन यार.”, तर शिव ठाकरे यांनी स्टारस्ट्रक इमोजीसह “अभिनंदन” केले. सिमरन भूद्रुपने लिहिले, “व्वा, हे खूप सुंदर आहे. नवीन सुरुवातीसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sreejita De (@sreejita_de)

जिग्यासा सिंग यांनी लिहिले, “माझ्या प्रियजनांनो अभिनंदन.” अशात मेहरजान मज्दा लिहिले, “मिस्टर आणि माईकचे अभिनंदन. खूप प्रेम.” मोनालिसाने लिहिले, “अभिनंदन… तुम्हा दोघांचे आयुष्य सुखी जावो.” इतर अनेक नेटिझन्स आणि श्रीजिताच्या चाहत्यांनी तिच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.(bigg boss 16 contestant and actress sreejita de marries michael blohm pape in germany church photos goes viral )

अधिक वाचा- 
‘नमक हलाल’, ‘गाेल माल’ यासारख्या दमदार चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीत पसरली शाेककळा
लंडनमधील विराट आणि अनुष्काचा ‘तो’ फोटो व्हायरल; अभिनेत्री म्हणाली, “फूल ऍन्जाय..”

हे देखील वाचा