Saturday, June 15, 2024

सुनील शेट्टीची जावई केएल राहुलसोबत अशी होती पहिली भेट, वाचा मजेशीर किस्सा

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी याची लेक अथिया शेट्टी लग्न बंधनात अडकली आहे. 23 जानेवारी 2023 रोजी अथिया शेट्टीने भारतीय क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले. लेकीच्या लग्नाने अभिनेत्याला खूप आनंद झाला आहे. कराण की, मंगलाेरचा मुलगा अभिनेत्याचा जावाई बनला आहे. पण मंडळी तुम्हाला माहित आहे का? की, अभिनेत्याची पहिली भेट केएल राहूलसाेबत कशी हाेती? हा किस्सा स्वत: अभिनेत्याने पहिल्यांदाच शेअर केला आहे. काय बाेला अभिनेता? चला जाणून घेऊया …

अलीकडेच, सुनील शेट्टी (suniel shetty) यांनी सांगितले की, 2019मध्ये जेव्हा केएल राहुल प्रथमच विमानतळावर दिसला तेव्हा त्यांची भेट कशी हाेती. सुनील शेट्टी अलीकडेच कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचला. त्यावेळी शोमध्ये कपिलशी बोलताना त्याने सांगितले की, “आम्ही दोघेही मंगलोरहून आहेत याचा मला आनंद झाला. आमची गावे एकमेकांच्या गावाजवळ आहेत.”

सुनील शेट्टीने पुढे सांगितले की, ” माझी पहिली भेट केएल राहुलबरोबर विमानतळावर झाली. तो माझ्या गावचा आहे म्हणजे मंगलोरचा आहे हे जाणून मला खूप आनंद झाला. मी त्याचा चाहता आहे आणि तो खूप चांगले काम करत आहे हे जाणून मला खूप आनंद झाला. जेव्हा मी घरी आलो, तेव्हा मी मान आणि अथिया यांना याबद्दल सांगितले. मात्र, यावर त्या जास्त बाेल्या नाहीत, त्यांनी फक्त एकमेकांकडे पाहिले. नंतर मानने मला सांगितले की, ‘अथिया आणि राहुल काही दिवसांपासून एकमेकांसाेबत बाेलत आहेत.'”

सुनील शेट्टी म्हणाला, “अथिया आणि राहुल एकमेकांना ओळखतात हे जाणून मला आश्चर्य वाटले. कारण, अथियाने याबद्दल मला सांगितले नव्हते. मात्र, तरिदेखील अथियाला दक्षिण भारतीय मुलगा आवडला हे जाणून मला खूप आनंद झाला.”

सुनील शेट्टीच्या वर्कफ्रंंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेता लवकरच त्याच्या सुपरहिट फ्रँचायझी ‘हेरा फेरी 3’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्या व्यतिरिक्त अक्षय कुमार आणि परेश रावल आहे.(bollywood actor suniel shetty opens up on first meeting with athiya husband kl rahul says surprised to know they were from same hometown )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माेठी बातमी! वयाच्या 101व्या वर्षी ‘या’ दिग्गज चित्रपट निर्मात्याचे झाले निधन

अनवाणी पायांनी आलियाने केले असे काही कृत्ये की, व्हिडीओ पाहून युजर्सही थक्क

हे देखील वाचा