Wednesday, March 4, 2026
Home बॉलीवूड ‘आम्ही अपयशावर चर्चा करत नाही..’ सुनील शेट्टीने केएल राहुलच्या खराब फॉर्मवर लगावला टोला

‘आम्ही अपयशावर चर्चा करत नाही..’ सुनील शेट्टीने केएल राहुलच्या खराब फॉर्मवर लगावला टोला

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी सध्या त्याच्या आगामी ‘हंटर’ या वेबसिरीजमुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या वेब सीरिजचे अभिनेता जोरदार प्रमोशन करत आहेत. अशात प्रमाेशनदरम्यान जिथे अभिनेता वेबसिरीजबदल्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत, तिथेच ताे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही माेकळेपणाने बाेलला आहे. अशा परिस्थितीत सुनील शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या जावयाच्या म्हणजेच भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलच्या क्रिकेट कारकिर्दीतील वाईट टप्प्याबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. काय म्हणाला अभिनेता? चला जाणून घेऊया…

जवळपास चार वर्षे डेटिंग केल्यानंतर, सुनील शेट्टी (suniel shetty) याची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल याने या वर्षाच्या सुरुवातीला लग्न केले. सुनील शेट्टी अनेकदा असे म्हणताना ऐकले जाते की, त्यांच्यासाठी अहान आणि केएल राहुल यांच्यात काही फरक नाही. अशा परिस्थितीत, केएल राहुलच्या खराब फॉर्मबद्दल अभिनेता काय म्हणाला हे जाणून घेणे मनोरंजक असेल. एका मुलाखतीत, अभिनेता म्हणाला, “आम्ही अपयशावर चर्चा करत नाही. कारण, तो एक सेनानी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.”

आपला मुद्दा पुढे नेत अभिनेता म्हणाला, “आम्ही त्याला अधिक प्रेम देताे. आम्ही जगातील प्रत्येक गोष्टीबद्दल बोलतो आणि त्यांचे मन हटवण्याचा प्रयत्न करतो. मी केएल राहुलला क्रिकेट कसे खेळायचे हे शिकवू शकत नाही. तो देशासाठी क्रिकेट खेळतोय, रस्त्यावरील क्रिकेट खेळत नाही की, कुणी कमेंट करून म्हणावं, असं खेळा, तसं खेळा.”

राहुलच्या आयुष्यातील हा एक अवघड टप्पा आहे आणि तो निघून जाईल असेही सुनील शेट्टी म्हणाला. अभिनेता म्हणाला, “मी एक तरुण माणूस कठीण परिस्थितीतून जात असल्याचे पाहत आहे, परंतु तो तेथे उभा राहून कठोर परिश्रम करण्यास तयार आहे.” असे सुनील शेट्टी यांनी मुलाखतीदरम्यान आपले मत मांडले.(bollywood actor suniel shetty talk about athiya husband kl rahul low phase in cricket they do not discuss faliure)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉसमधील ‘या’ लोकप्रिय स्पर्धकाने अपेक्षित मानधन मिळत असूनही दिला रोहित शेट्टीच्या शो ला नकार

रितेश देशमुखने भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केला ‘तो’ फोटो शेअर, वडिलांची आठवण काढत म्हणाला…

हे देखील वाचा