Tuesday, March 5, 2024

राखीने उघडपणे विचारले कोण आहे केएल राहुल? पॅपराझी म्हणाले, ‘सुनील शेट्टीचा जावई’, एकदा पाहच व्हिडिओ

ड्रामा क्वीन राखी सावंत प्रसिद्धीझोतात राहण्याची एकही संधी सोडत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. आधी आईचा मृत्यू आणि नंतर तिने पती आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे आदिल तुरुंगात आहे. त्याच वेळी, या सर्व प्रकारानंतर, अभिनेत्री पुन्हा कामावर परतली आणि काही दिवसांपूर्वी तिचा एक म्युझिक व्हिडिओ देखील रिलीज झाला आहे, ज्यामध्ये तिचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्यात आले आहे. अशात राखीचा असा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याला पाहून लोकांनी तिला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

सोशल मीडियावर एका फॅन पेजने राखी सावंत (rakhi sawant) हिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्री विमानतळावर दिसली. या व्हिडिओमध्ये राखी कार पार्किंग एरियामध्ये पॅपराझींसाेबत बोलताना दिसत आहे. यादरम्यान एका कॅमेरामनने सांगितले की, कारमध्ये केएल राहुल आहे, तर राखी म्हणाली,’कोण आहे केएल राहुल?’

त्यानंतर पॅपराझींने राखीला केएल राहुल हा क्रिकेटपटू असल्याची आठवण करून देण्यात मदत केली, ज्यानंतर राखीलाही  आठवले. अशात एक पॅपराझी मागून म्हणाला की, ‘सुनील शेट्टीचा जावई’ आहे केएल राहुल. हे ऐकताच राखी सावंतला लगेच केएल राहूल आठवला आणि तिने अथिया शेट्टीला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. मग काय या व्हिडिओवर युजर्सने राखीला प्रचंड ट्राेल कण्यास सुरुवात केली. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने राखीला ट्रोल केले आणि लिहिले, ‘अरे यार, हिला केएल राहुलला जवळ जाऊ देऊ नका, ती त्यालाही स्वतःसारखा वेडे बनवेल’, तर एका युजरने लिहिले की, ‘हे ऐकण्यापूर्वी मी बहिरा का नाही झालो.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांनी 2022मध्ये गुपचूप लग्न केले, ज्यानंतर या लग्नाचा खुलासा जानेवारी 2023 मध्ये झाला. लग्नापूर्वी राखी सावंतने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचे नाव बदलून फातिमा ठेवले. अशात अलीकडेच राखीला रमजान महिन्याच्या सुरुवातीला उपवास केल्यामुळे लाेक ट्र्राेल केले जात आहे.  (who is kl rahul tv actress rakhi sawant could not recognize the cricketer at the airport pep help her recall)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
किरण खेरनंतर आता ‘ही’ अभिनेत्री सापडली कोरोनाच्या विळख्यात, ट्विट करून दिली माहिती

पारंपरिक वेशभूषेत कीर्तीने जिंकले चाहत्यांचे मन, फोटो गॅलेरी पाहाच

हे देखील वाचा