Sunday, June 23, 2024

कॅटरिनाच्या ताेंडून पहिल्यांदाच पंजाबी गाणं ऐकल्यावर विकीने अभिनेत्रीला दिली सुचना; म्हणाला, ‘कुठेही गाऊ नकोस’

विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे बॉलिवूडमधील गाेंडस जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. त्यांची लव्हस्टोरीही खूप खास आहे. विकी कौशलला इम्प्रेस करण्यासाठी कॅटरिना कायमच काही नवीन उपक्रम करत असते. इतकंच नाही, तर गाण्याचा नेमका अर्थ माहित नसतानाही अभिनेत्री पंजाबी गाणं शिकली, ज्याचा खुलासा नुकताच विकी कौशलने केला आहे.

विकी कौशल सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विकी कौशलने त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टीही शेअर केल्या आहेत.

अलीकडेच विकी कौशलने सांगितले की, ‘एक काळ असा होता जेव्हा कॅटरिना कैफने त्याला इंप्रेस करण्यासाठी पंजाबी गाणं शिकली.’ यादरम्यान अभिनेत्याने सांगितले की, ‘कॅटला पंजाबी भाषा येत नाही, त्यानंतरही तिने खूप चांगला प्रयत्न केला, परंतु तिने चुकीचे गाणे निवडले होते.’

विकी कौशल म्हणाला, ‘कॅटरिनाला हे गाणे रोमँटिक वाटले होते, पण प्रत्यक्षात गाणे हिंसाचाराने भरलेले हाेते.’ अशात गाणे ऐकल्यानंतर विकी अभिनेत्री म्हणाला, ‘मला त्यातील रोमान्स जाणवू शकतो, पण ते कुठेही गाऊ नको’. विकी कौशलने असेही सांगितले की, कॅटरिना पंजाबी भाषेतील काही शब्द देखील शिकले आहेत. उदाहरणार्थ,  ‘की हालचाल’, ‘वडिया है’ इ.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विकी कौशलने कॅटरिनासाेबतच्या नात्याबद्दल सांगितले की, ‘त्याचे वैवाहिक जीवन खूप आनंदात जात आहे.’ कॅटरिनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे, तर विकी कौशल मेघना गुलजारचा ‘साम बहादूर’ चित्रपटात दिसणार आहे.(bollywood actor vicky kaushal reveals katrina kaif once learned wrong punjabi song for him without knowing its actual meaning )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
तापसीने पिवळ्या बिकिनीमध्ये समुद्रात मारली डुबकी; अभिनेत्रीचा थक्क करणारा व्हिडिओ एकदा पाहाच
190 कोटींच्या आलीशान घराबद्दल उर्वशीच्या आईने साेडले मौन; म्हणाल्या, ‘इंशाअल्लाह…’

हे देखील वाचा