बॉलिवूड आणि टीव्हीचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले. अनेक दिवस ते रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. विक्रम गाेखले त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जायचे. त्यांनी अनेक दमदार चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे.
बॉलिवूड आणि छोट्या पडद्यासोबतच त्यांनी मराठी रंगभूमीवरही नाव कमावले. विक्रम गाेखले यांचे वडील चंद्रकांत गोखले (vikram gokhale) हे देखील मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील कलाकार होते. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटांच्या पहिल्या अभिनेत्री असल्याचं म्हटलं जातं. याशिवाय त्यांची आजी कमलाबाई गोखले याही अभिनेत्री होत्या. त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत पहिल्या बालकलाकार म्हणून काम केले.
विक्रम गोखले यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांनी कमी वेळातच रुपेरी पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. विक्रम गाेखले यांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परवाना’ या चित्रपटातून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘भूल भुलैया’, ‘दे दना दन’, ‘बँग बँग’, ‘स्वर्ग नरक’, ‘इन्साफ’, ‘अग्निपथ’, ‘खुदा गवाह’, ‘अधर्म’, ‘तडीपार’, ‘आंदोलन’, ‘अय्यारी’, ‘हिचकी’ आणि ‘मिशन मंगल’ यासारखी दमदार चित्रपट त्यांनी बाॅलिवूडला दिली.
त्याचबरोबर तो छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्येही दिसले. त्यांनी ‘सिंहासन’, ‘मेरा नाम करेगी रोशन’ ‘उडान’, ‘इंद्रधनुष’, ‘क्षितिज ये नही’, ‘संजीवनी’, ‘जीवन साथी’, यासारख्या प्रसिद्ध मालिकेत काम केले. सण 2010 साली त्यांनी दिग्दर्शक म्हणून ‘घट’ हा मराठी चित्रपट बनवला. त्याचसाेबत त्यांना रंगभूमीवरील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय 2013 साली आलेल्या ‘अनुमती’ या मराठी चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. (bollywood actor vikram gokhale passed away know about actor films and tv serials)
हेही वाचा-
–दिल तो पागल है चित्रपटाला 26 वर्ष पुर्ण, यशराज फिल्मने शेअर केला व्हिडिओ
–खलनायक बनूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात दलीप ताहिल, शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटाने दिली खरी ओळख