Monday, June 17, 2024

दिल तो पागल है चित्रपटाला 26 वर्ष पुर्ण, यशराज फिल्मने शेअर केला व्हिडिओ

साल 1997 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘दिल तो पागल है’ याला आज 26 वर्ष पूर्ण झालं आहे. या चित्रपटाने बॉक्सऑफीसवर खूप धमाल केली होती. आजही लोक हा चित्रपट आवडीने पाहात असतात. यामध्ये माधुरी दीक्षित, शाहरुख खान, आणि करिना कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दाखवले असून अक्षय कुमार याने पाहुण्या कलाकाराची भूमिका निभवली होती. चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांवर भुरळ घातली होती.

बॉलिवूडचे असे काही चित्रपट आहेत जे, आजही प्रेक्षक आवडीने पाहात असतात, त्यापैकीच ‘दिल तो पागल है’ हा चिपट आहे. सोमवारी (दि. 30 ऑक्टोंबर) दिवशी या चित्रपटाला 26 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल यशराज फिल्मतर्फे एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये व्हिडिओच्या बॅग्राउंडमध्ये दिल तो पागल हैं गामणे वाजत असून चित्रपटातील काही सीनची एक झलक दाखवली आहे. या व्हिडिओला शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “26 वर्षापूर्वी… राहुलने विचारले होते प्रेम काय आहे? आणि ‘दिल तो पागल है’ ने सगळ्यांना प्रेम आणि मैत्रिला परिभाषित केले! आशा चित्रपटाचा जल्लोष साजरा करणे जे आमच्या मनाशी खूप जवळ आहे. #दिल तो पागल है चे 26 वर्ष पूर्ण.”

गेल्या 26 वर्षापूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट दिल तो पागल हैने बॉक्स ऑफीसवर चागलीच धमाल केली असून ब्लॉकबास्टर ठरला होता. या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार देखिल मिळाले होते. त्यापैकी सर्वश्रेष्ठ सहाय्यक पुरस्कार अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) हिला मिळाला असून बेस्ट कोरियोग्राफर शायमक डावर याला मिळाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका युजर्सने लिहिले की, “हा असा चित्रपट आहे, ज्यला मी कधीच विसरु शकत नाही.” दुसऱ्याने लिहिले की, “मी आता किशोर वयात असून खूप खुश आहे की या वेळेस! या चित्रपटाला बघून खरच खूप आनंद झाला आहे.” एका अन्य युजरने लिहिले की, शाहरुख खानच्या ‘पठान’ चित्रपटाचाही ट्रेलर लवकर प्रदर्शित केला पाहिजे.

अनेक चाहते या व्हायरल व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव करत आहेत. मैत्री आणि प्रेमाचे नाते शिकवणाऱ्या चित्रपटाला आजही तेवढेच प्रेम मिळत आहे जेवढे 26 वर्षापूर्वी मिळत होते.

हेही वाचा-
जान्हवी आणि खुशी कपूर होत्या एकाच व्यक्तिच्या प्रेमात वेड्या? जाणून घ्या काय आहे ‘मोठ्या बहिणी’चे उत्तर
लाडक्या ‘शितली’चा अंदाज तुम्हालाही लावेल वेड; पाहा फोटो

हे देखील वाचा