Saturday, July 6, 2024

‘द लेडी किलर’च्या कमाईचा आलेख पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घसरला, कलेक्शन जाणून तुम्हालाही बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांचा ‘द लेडी किलर‘ या चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट बेकायदेशीर संबंधांवर आधारित आहे, ज्यामध्ये प्रेम आणि अॅक्शनसोबतच मर्डर मिस्ट्रीचा जबरदस्त फ्लेवर पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्यात अनेक इंटिमेट सीन्स पाहायला मिळत आहेत. अर्जुन कपूर-भूमी पेडणेकर स्टारर चित्रपट ‘द लेडी किलर‘चे पोस्टर 28 ऑक्टोबर रोजी रिलीज झाले.

यानंतर या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आणि चित्रपट देखील रिलीज रिलीज झाला आहे. हा चित्रपट 3 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे. बरंच काही झालं पण चित्रपटाच्या दोन प्रमुख कलाकारांनी, अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांनी आजपर्यंत चित्रपटाचं प्रमोशन केलं नाही. अजय बहल दिग्दर्शित या चित्रपटाची कथा प्लेबॉय आणि खतरनाक मुलीभोवती फिरते. या चित्रपटातून अर्जुन आणि भूमी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. अर्जुन आणि भूमी या दोघांचे शेवटचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झालेले नाहीत. अशा परिस्थितीत दोघांनाही या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

‘द लेडी किलर’मध्ये (The Lady Killer) अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांची स्टार पॉवर असूनही, चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यात अपयशी ठरला आहे. चित्रपटाची ओपनिंग खूपच थंड होती आणि त्यामुळे त्याच्या कमाईवरही परिणाम झाला. आता ‘द लेडी किलर’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडेही आले आहेत. सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपटाची देशभरात केवळ 293 तिकिटे विकली आहेत आणि केवळ 38000 रुपये कमावले आहेत.

हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला असून यासोबतच हा चित्रपट रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर घसरला आहे. ‘द लेडी किलर’ चित्रपटगृहांमध्ये जास्त काळ टिकण्याची आशा नाही. आणि यासोबतच अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकर यांच्या फ्लाॅप चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश झाला आहे. (Bollywood actors Arjun Kapoor and Bhumi Pednekar starrer The Lady Killer has dropped at the box office on its first day)

आधिक वाचा-
‘असं’ काय झालं होतं? ज्यामुळे हेमांगी कवीला मागावी लागली जाहीर माफी, एकदा वाचाच
‘कुछ कुछ होता है’च्या अंजलीचा रकुल प्रीतवर झाला चांगला प्रभाव; म्हणाली, ‘मीही तिच्यासारखीच झाले होते’

हे देखील वाचा