×

ऐकावं ते नवलच! चित्रपट साइन करण्यापूर्वी कलाकार करतात ‘अशा’ विचित्र मागण्या, ऐकून निर्मातेही धरतात डोकं

बॉलिवूडमधील स्टार्स अनेकदा नाव कमावल्यानंतर त्यांच्या मनाप्रमाणे काम करू लागतात. मग ते त्यांच्या चित्रपटांची निवड असो किंवा मग त्यांना मिळणारी फी. पण या सर्व मागण्यांव्यतिरिक्त काही सेलिब्रिटींच्या अशाही मागण्या आहेत, ज्याशिवाय ते चित्रपट साइन करत नाहीत. असे अनेक प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्स आहेत, जे चित्रपट साइन करण्यापूर्वी विचित्र डिमांड करतात. कधी-कधी स्टार्सच्या विचित्र मागण्या ऐकून निर्माते डोके धरतात. अशा स्टार्सच्या यादीत सलमान खानपासून ते करीना कपूर खानपर्यंतचा समावेश आहे. (bollywood actors who put weird demands infront of film producers)

आमिर खान (Aamir Khan)
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच आपल्या चित्रपटांमध्ये काहीतरी वेगळं करण्याचा विचार करतो. तो त्याच्या चित्रपटाच्या निर्मात्यांसमोर लो अँगल शॉट्स शूट करण्याची मागणी करतो. जे या गोष्टीला सहमती दर्शवतात, तेच आमिर खानसोबत काम करू शकतात.

ऋतिक रोशन (Hrithik Roshan)
बॉलिवूडचा हँडसम हंक ऋतिक रोशनची फिटनेसची क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. तो त्याच्या फिटनेससाठी जगभर प्रसिद्ध आहे आणि आपली फिटनेस कायम राखण्यासाठी तो निर्मात्यांकडे जिमची मागणी करतो. तो जिथे शूट करतो, तिथे त्याला जिम पाहिजेच असते. मग ते भारतात असो किंवा परदेशात!

सलमान खान (Salman Khan)
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानबद्दल सांगायचे झाले तर, तो जेव्हाही एखादा चित्रपट साईन करतो तेव्हा एक अट समोर मांडतो. तो कोणत्याही सीनमध्ये नायिकेसोबत इंटिमेट सीन करणार नाही आणि ऑन-स्क्रीन किस करणार नाही, असे त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आधीच लिहिलेले असते. (weird demands made by bollywood celebs before signing a film)

अक्षय कुमार (Akshay Kumar) 
वक्तशीरपणामध्ये काटेकोर असणारा अक्षय कुमार त्याच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, रविवारी १ दिवसाची सुट्टी नक्कीच घेतो. जेणेकरून तो आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवू शकेल.

करीना कपूर (Kareena Kapoor)
करीना कपूरची एक विलक्षण मागणी आहे. अभिनेत्रीच्या अटीनुसार, तिच्या चित्रपटांमध्ये फक्त बॉलिवूडचे ए-लिस्ट स्टार्सच तिच्या विरुद्ध भूमिका करतील.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post