बॉलिवूड कलाकार हे नेहमीच त्यांच्या आलिशान जगण्यामूळे जास्तच चर्चेत असतात. चैनीचे जीवन जगण्याकडे आणि महागड्या वस्तू खरेदी करण्याकडे त्याचा जास्तच कौल असतो. एका चित्रपटासाठी करोडोच्या भावात पैसे कमवणारे हे कलाकार त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. त्यांच्यासाठी त्याचं आरोग्यचं एक मोठी संपत्ती असते. चित्रपटसृष्टीत असे खूप नामवंत कलाकार आहेत, जे ५० ते ६० वय असूनही तरुन पिढीला लाजवेल इतके तरुन दिसतात. यामागचे कारण हेच की, ते त्यांच्या फिटनेसकडे जास्त लक्ष देतात. तुम्ही विचार करत असाल की, ऐवढे व्यस्त असताना ही यांना कसरतीसाठी वेळ मिळत असेल का? हे कलाकार कसे काय येवढे त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देतात. वास्तविकता ही आहे की, या कलाकरांनी घरीच व्यायामशाळा बनवली आहे, जेव्हा ही त्यांना वेळ मिळतो तेव्हा ते कसरत करतात आणि आपल्या फिटनेसकडे लक्ष देतात.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान दोन मुलांची आई आहे. परंतु तिचे फिटनेस आणि चेहऱ्याची चमक पाहून तुम्हाला त्याच्या वयाचा अंदाज येणार नाही. ती फिट राहण्यासाठी घरीच योगा करते. त्यासोबतच ती व्यायाम करण्यासाठीही घरीच छोटी व्यायाम शाळा तयार केली आहे.
सगळ्यात फिटेस्ट स्टार अभिनेता टाइगर श्रॉफ कधीही त्याच्या फिटनेसकडे दुलर्श करत नाही. लॉकडाउनच्या दरम्यान जेव्हा सर्वजन घरामध्ये कंटाळत होते, तेव्हा टाइगर श्रॉफ त्याच्या घरातल्या जिममध्ये १२-१२ तास व्यायाम करत होता. आणि अश्या प्रकारने त्याने कोरोनाच्या काळातही त्याचा कार्डिओ दिनचर्या सुरु ठेवली.
अभिनेता ऋतिक रोशन हा सगळ्यात फिट कलाकार आहे. फिटनेसच्या बाबतीत टाइगर श्रॉफही ऋतिक रोशनला आदर्श मानतो. ऋतिक रोशन हा आपल्या फिटनेसकडे खूप लक्ष्य देतो त्याला फिटनेसप्रेमी म्हणलं तरी चालेल.तो फिटनेसच्या मागे इतका वेडा आहे की, त्यानी त्याच्या भाड्याच्या घरातच एक इन हाउस जीम लावली आहे. एवढेच नाही तर या अभिनेत्याने त्याच्या फार्महउसवर पण एक जिम बनवली आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला फिटनेसची रानी मानले जाते. या अभिनेत्रीने तिच्या वयानुसार स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तिच्या बंगल्यात एक आलिशान जिम बनवली आहे. ४६ वर्षाची शिल्पा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर जिमचे व्हिडिओ पोस्ट करून लोकांना तंदुरुस्त राहण्यासाठी आणि योगासने करण्यास प्रवृत्त करते.
- ‘या’ मोठ्या अभिनेत्रींच्या ब्रेस्टमध्ये झाली होती टेनिस बॉल एवढी मोठी गाठ, सर्जरी झाल्यानंतर शेअर केला फोटो
- ‘मैने प्यार किया’ फेम अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केला ३३ वर्ष जुना फोटो म्हणाली, ‘माझा विश्वास बसत नाही…
- इंडियाज गॉट टॅलेटमधील दिव्यांश आणि मनुराज यांच्या परफॉर्मन्सने रोहित शेट्टी झाला प्रभावित, थेट दिली सिनेमाची ऑफर