Tuesday, June 18, 2024

बोल्डनेसचा कहर! ऐश्वर्याचा ‘हा’ व्हिडिओ झाला व्हायरल, पाहून तुम्हीही व्हाल अवाक

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राॅय काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण आजही या अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र आहे. मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर ऐश्वर्या राय चित्रपटांकडे वळली. या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम करून आपला अभिनय आणि साैंदर्याने चाहत्याच्या मनात स्थान निर्माण केले. ऐश्वर्या रायॅच्या मॉडेलिंगच्या दिवसातील अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील, पण तुम्ही माजी मिस वर्ल्डला कधी रॅम्प वॉक करताना पाहिले आहे का?, नसेल पाहिले तर आज आम्ही तुम्हाला ऐश्वर्या रायॅचा एक जुना व्हिडिओ दाखवतो.

सध्या ऐश्वर्या राॅयचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ही अभिनेत्री वेगवेगळ्या कार्यक्रमांदरम्यान रॅम्प वॉक करताना दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रींचे अनेक लूक्सही वेगवेगळ्या ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेच्या स्विमसूट राउंडसाठी ऐश्वर्याने केलेल्या रॅम्प वॉकची झलकही पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Entertainment Say (@entertainmentsay)

ऐश्वर्या रायने 19 नोव्हेंबर 1994 रोजी ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकला होता. त्यावेळी ऐश्वर्या केवळ 21 वर्षांची होती. ऐश्वर्याशिवाय अनेक अभिनेत्रींनी ‘मिस वर्ल्ड’चा किताब पटकावला आहे. मात्र,आजही जगभरात चर्चा ऐश्वर्याच्या सौंदर्याची  हाेते.

मॉडेलिंग करिअरमध्ये यश मिळवल्यानंतर ऐश्वर्या चित्रपटांकडे वळली. या अभिनेत्रीने 1997 मध्ये प्रसिद्ध चित्रपट निर्माता मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि त्याच वर्षी अभिनेत्रीने ‘और प्यार हो गया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ऐश्वर्याने यशाचे शिखर गाठताना कधीच मागे वळून पाहिले नाही.(bollywood actress aishwarya rai miss world ramp walk video goes viral bachchan bahu look unrecognizable)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तुम्हाला त्याचा राग येता कामा नये’ गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन लोकांना दाखवला आरसा

अनवाणी पायांनी ऑस्कर पुरस्कारासाठी रवाना झाला राम चरण, काय आहे कारण? घ्या जाणून…

हे देखील वाचा