बाॅलिवूडची लाेकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट अलीकडेच एका इवेंटमध्ये पोचली हाेती, जिथे कॅमेरासमोर तिने बऱ्याच सुंदर पोझेस दिल्यात, परंतु त्यानंतर जे घडले ते कॅमेर्यामध्ये पकडले गेले. आलियाचा हा व्हिडिओ पॅपराझींने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती अवॉर्ड फंक्शनदरम्यान फाेन मागताना दिसत आहे.
तर झाले असे की, एका अवॉर्ड फंक्शनमध्ये काेणीतरी व्यक्ती मागून सांगत आहे की, “माझाच फोन आहे, तुम्ही तेथून घेऊन या, आम्हाला तुमच्याबरोबर सेल्फी काढायची आहे.” यानंतर, आलिया भट्ट या व्हिडिओमध्ये कॅमेर्यासमोर लोकांना विचारत आहे की, “सॅमसंग कोणकडे आहे?” हे ऐकून प्रत्येकजण हसतो, पण थाेड्या वेळा नंतर ती शाेधत असलेला फाेन मिळताे. ती फोन हातात घेते आणि विचारते, “सेल्फी कॉर्नर कोठे आहे?”
View this post on Instagram
अशात आता लोक आलियाच्या या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट करीत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की,”सॅमसंगची इतकीच आवड आहे, तर मग आयफोन का वापरते?” तर एका युजर्सने लिहिले की, “आयफोन गजब बेइज्जती आहे.”
View this post on Instagram
आलियाच्या आगामी चित्रपटाबद्दल बाेलायचे झाले, तर ती लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासाेबत रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. या व्यतिरिक्त, आलिया तिच्या पहिल्या हॉलिवूड चित्रपट’हार्ट ऑफ स्टोन’ यातही दिसणार आहे, जाे नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
अलीकडेच, नोव्हेंबर 2022 मध्ये आई बनलेली आलिया भट्ट सध्या तिच्या कुटुंब आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या वर्षी 1 एप्रिल रोजी आलियाने रणबीर कपूरशी लग्न केले आणि नोव्हेंबरमध्ये एका मुलीला जन्म दिला, जिचे नाव राहा ठेवले आहे.(bollywood actress alia bhatt asking about samsung phone netizens saying le bhai i phone gajab bezatti hai teri)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रार्थना बेहेरेने शेअर केला १५ वर्षांनी आयुष्यात आलेला ‘तो’ अविस्मरणीय अनमोल दिवस
‘ही नव्या पुस्तकाची सुरुवात’ या सकारात्मक नोटवर अभिनेत्री मानसी नाईकने शेअर केले तिचे सुंदर फोटो