Monday, June 24, 2024

आपल्या एक्सच्या लग्नात हसत – हसत सहभागी झाले ‘हे’ बॉलिवूड स्टार्स, एकदा पाहाच यादी

आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत संपूर्ण आयुष्य घालवायला सर्वांना आवडते, पण अनेकवेळा नाती तुटतात परिणामी लग्नाची स्वप्नेही अर्धवट राहतात. मात्र, बॉलिवूड स्टार्स या बाबतीत पूर्णपणे वेगळे आहेत. याचे ताजे उदाहरण  कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांच्या लग्नात पाहायला मिळाले, जेव्हा सिद्धार्थची एक्स गर्लफ्रेंड आलिया भट्टने त्यांचे लग्नानिमित्त अभिनंदन केले. इतकेच नाही तर बाॅलिवूडमध्ये असेही काही स्टार्स आहेत ज्यांनी त्यांच्या एक्सच्या लग्नाला आनंदाने हजेरी लावली होती. चला जाणून घेऊया या स्टार्सबद्दल.

प्रियांका चाेप्राच्या लग्नात शाहिद कपूरने लावली हजेरी
माध्यमातील वृत्तांनुसार, शाहिद कपूर आणि प्रियांका चोप्रा ‘कमिने’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे काहीही सांगितले नाही. अशात मीडियामध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना वेग तेव्हा आला जेव्हा इन्कम टॅक्सची टीम प्रियांका चोप्राच्या घरी पोहोचली आणि तिथे शाहिद कपूरही दिसला. यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा आगीसारखी पसरली. मात्र, नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. बऱ्याच वर्षांनंतर 2018 मध्ये प्रियांकाचे लग्न झाले तेव्हा शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत अभिनेत्रीच्या रिसेप्शनला पोहोचला.

रणवीर-दीपिकाच्या रिसेप्शनला अनुष्काने लावली हजेरी
एकेकाळी अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंग यांच्या डेटिंगच्या बातम्या साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत हाेत्या. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटात दोघांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, पुढे दोघेही वेगळे झाले, पण दोघांमधील मैत्रीचे नाते कायम राहिले. दीपिका आणि रणवीर सिंगचे लग्न झाले तेव्हा अनुष्का शर्मानेही त्यांच्या मुंबईत झालेल्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. अनुष्काच्या येण्याने खूप आनंद झाल्याचेही रणवीरने नमूद केले हाेते.

साेनम कपूरच्य लग्नात रणबीर कपूर
रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांनी संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाच्या सेटवर दाेघांची मैत्री झाली अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. मात्र, काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांचे मार्ग वेगळे झाले. असे असूनही, वर्षांनंतर रणबीर कपूरने सोनम कपूरच्या लग्नाला आनंदाने हजेरी लावली. रणबीर कपूरने सोनम कपूरच्या लग्नात आलिया भट्टसोबत हजेरी लावली होती.(bollywood actress alia bhatt congrats sidharth kiara advani wedding stars happily attended ex wedding shahid to ranbir kapoor)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मनीमाऊचं बाळ कसं…’, मानसी नाईकचे लेटेस्ट फाेटाे एकदा पाहाच

ब्रेकअपनंतरही ‘या’ अभिनेत्रींने केले एक्स बॉयफ्रेंडसोबत चित्रपटात काम, पाहा यादी

हे देखील वाचा