Saturday, June 29, 2024

गरोदर आलिया भट्टचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘हाेण्याऱ्या बाळासाठी रणबीरने…’

बाॅलिवूड लाेकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट आणि सुपरस्टार रणबीर कपूर काही महिन्यांतच पालक होणार आहेत. कुटुंब आणि मित्रांसोबतच चाहतेही त्यांच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच, आलियाचा डाेहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. ज्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हयरल झाले हाेते. या दरम्यान, आलिया भट्टने सांगितले की, येणाऱ्या मुलासाठी रणबीर काय प्लॅनिंग करत आहे.

अभिनेत्री आलिया (Alia Bhatt) हिने खुलासा केला की, रणबीर (Ranbir Kapoor) आता जबाबदार झाला आहे. ताे त्याच्या बाळासाठी  खूपच उत्साही आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार झाला आहे. रणबीर बाळासाठी अनेक याेजना आखत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ????☀️ (@aliaabhatt)

आलिया भट्ट तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. मात्र, या काळातही ती तिच्या कामातील कमिटमेंट पूर्ण करत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आलिया खूपच सक्रिय दिसत होती, तिच्या चेहऱ्यावर अजिबातच थकवा जाणवत नव्हता. पण मुलाबाबत रणबीरची स्ट्रैट्जी काय आहे हे सांगताना आलिया म्हणाली की, “त्याने आतापासूनच याेजना आखायला सुरुवात केली आहे. रणबीरने ठरवलं आहे की, या महिन्यापर्यंत काम करायचं, मग विश्रांती घ्यायची, त्यानंतर पुन्हा काम सुरू करायचं आहे.” रणबीर त्याच्या नव्या जबाबदारीबद्दल खूप खूश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ????☀️ (@aliaabhatt)

आलियाला पुन्हा घेऊन जायचे आहे सिनेसृष्टीत
अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरने सांगितले होते की, “त्याला बाळासोबतच आलियाचीही जबाबदारी घ्यायची आहे. आलियाला पुन्हा सिनेमाच्या दुनियेत आणण्याची जबाबदारी त्याची असल्याचे रणबीरने सांगितले. चाहत्यांना तिला पाहणे आवडते. आलियाला स्क्रीनची वेगळी क्रेझ आहे. अशा परिस्थितीत आई झाल्यानंतर सिनेसृष्टीशी जोडली असने, ही माझी जबाबदारी आहे.”

रणबीर कपूरने केला आलिया भट्टबद्दल हा खुलसा
मुलाखतीत जेव्हा रणबीर कपूरयाला विचारण्यात आले की, आलिया भट्ट बद्दल एक अशी गोष्ट जी ताे सहन करतो. यावर अभिनेत्याने सांगितले की, “जेव्हा आलिया झोपते तेव्हा ती तिरकस होते त्यामुळे पलंगाची जागा लहान होत जाते. रणबीरच्या म्हणण्यानुसार, झोपत असताना आलियाचे डोके एकीकडे असते तर तिचे पाय दुसरीकडे.” त्यामुळे आलिया भट्टसोबत झोपताना रणबीर स्वत:ला पलंगावर खूप ऍडजस्ट करताे.

ब्रह्मास्त्र चित्रपटाने केली दमदार कमाई
अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर व्यतिरिक्त आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये शाहरुख खानही एका खास कॅमिओमध्ये दिसला. या चित्रपटाने जगभरात चांगली कमाई केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सात दिवसात वादग्रस्त सीन काढायचे, नाहीतर…’, ‘आदिपुरुष’च्या दिग्दर्शकाला ब्राह्मण महासभेची नोटीस

सोनालीच्या मोनोक्रोम फोटोंचा राडा, पाहा मराठमोळ्या वेशभूषेतील फोटो

हे देखील वाचा