Thursday, April 25, 2024

बापरे बाप! रणबीर कपूरने केला खुलासा, म्हणाला, ‘आलिया भट्टसाेबत एकाच बेडवर…’

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. या चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या दोघांची केमिस्ट्री पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळाली. त्याच वेळी, नुकत्याच  दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याने उघड केले की पत्नी आलिया भट्टसोबत एकाच बेडवर झोपणे हे त्याच्यासाठी किती माेठे टास्क आहे. 

रणबीर कपूरने केला आलिया भट्टबद्दल हा खुलसा
एका मुलाखतीत जेव्हा रणबीर कपूर(Ranbir Kapoor) याला विचारण्यात आले की, आलिया भट्ट (Alia Bhatt) बद्दल एक अशी गोष्ट जी ताे सहन करतो. यावर अभिनेत्याने सांगितले की, “जेव्हा आलिया झोपते तेव्हा ती तिरकस होते त्यामुळे पलंगाची जागा लहान होत जाते. रणबीरच्या म्हणण्यानुसार, झोपत असताना आलियाचे डोके एकीकडे असते तर तिचे पाय दुसरीकडे.” त्यामुळे आलिया भट्टसोबत झोपताना रणबीर स्वत:ला पलंगावर खूप ऍडजस्ट करताे.

आलियाला आवडते पती रणबीर कपूरचे मौन
या मुलाखतीदरम्यान आलिया भट्टलाही हाच प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात अभिनेत्रीने सांगितले की, “तिला रणबीरची एक गोष्ट आवडते ती म्हणजे त्याचा मौन. तिच्या मते रणबीर चांगला लिसनर आहे. मात्र, काही वेळा तिला रणबीर कपूरचे मौनही आवडत नाही.”

ब्रह्मास्त्र चित्रपटाने केली दमदार कमाई
अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर व्यतिरिक्त आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. यामध्ये शाहरुख खानही एका खास कॅमिओमध्ये दिसला. या चित्रपटाने जगभरात चांगली कमाई केली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमानला काय गिफ्ट देणार? गोविंदाचे उत्तर ऐकून व्हाल थक्क; म्हणाला, ‘त्याची आधीच वाट…’
शोकसभेत राजू श्रीवास्तव यांच्या पत्नी ढसाढसा रडल्या; म्हणाल्या, ‘आयुष्यच संपलं…’

हे देखील वाचा