बाॅलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने तिच्या करिअरची सुरुवात ‘कहो ना प्यार है‘ या ब्लॉकबस्टर चित्रपटातून केली होती. यानंतर ती ‘गदर‘ आणि ‘भूल भुलैया‘ सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली. मात्र, इंडस्ट्रीत अमीषाच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याची खूप चर्चा झाली. विक्रम भट्टसोबतच्या तिच्या नात्याच्या बातम्याही जाेरदार चर्चेत आल्या होत्या. अमिषा आणि विक्रम भट्ट यांनी त्यांचे नातेही जाहीरपणे स्वीकारले हाेते. अशात आता नुकतेच पुन्हा एकदा अमिषा पटेलने विक्रम भट्टसोबतच्या तिच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला, जाणून घेऊया…
विक्रम भट्टसाेबतच्या नात्याबद्दल बोलताना अमिषा पटेल ( ameesha patel) म्हणाली, “या इंडस्ट्रीत जर तुम्ही प्रामाणिक असाल, तर हा प्रामाणिकपणा स्वीकारला जात नाही आणि मी खूप प्रामाणिक आहे. कारण, माझ्यासाठी आयुष्य ब्लॅक आणि व्हाईट आहे. मी कशाचाही फार विचार करत नाही आणि मला वाटत नाही की, हे माझ्या आयुष्यातील कमतरता आहे. माझ्या आयुष्यात दाेन नातेसंबंधांनी महत्वाची भूमिका बजावली आहे, जी मी जाहिरपणे स्वीकारली आहे. हाेय, याचा माझ्या आयुष्यावर परिणाम झाला, ज्यामुळे मी माझ्या आयुष्यात 12-13 ते वर्ष काेणालाही येऊ दिले नाही. मात्र, आता मला माझ्या आयुष्यात फक्त शांती हवी आहे.”
अमिषा पटेल आणि विक्रम भट्ट यांनी एकमेकांना 5 वर्षे डेट केले होते. त्यानंतर विक्रम भट्टचा चित्रपट ‘1920’ रिलीज होण्यापूर्वीच दोघांचे मार्ग वेगळे झाले. एकदा विक्रमने अमिषाबद्दल बोलताना सांगितले होते की, ‘एक अभिनेत्री म्हणून तिच्यासाठी करिअर किती महत्त्वाचे आहे हे मला समजते.’
View this post on Instagram
अमिषाने तिच्या अभिनय काराकिर्दीत अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. अशात सध्या अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट ‘गदर2’मुळे चर्चेत आहे, जाे 11ऑग्स्टला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. (bollywood actress ameesha patel spoke openly on her relationship with vikram bhatt said publicly speaking damaged my career)
अधिक वाचा-
काजाेलची लेक न्यासा पॅपराझींना हाताळते ‘अशा’ प्रकारे; अभिनेत्री म्हणाली, ‘तिच्या जागी मी असते, तर…’
शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड अडकली विवाह बंधनात? जाणून घ्या सत्य