Monday, June 17, 2024

काजाेलची लेक न्यासा पॅपराझींना हाताळते ‘अशा’ प्रकारे; अभिनेत्री म्हणाली, ‘तिच्या जागी मी असते, तर…’

बाॅलिवूड अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी न्यासा देवगण सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. दरम्यान, काजोलने तिची मुलगी न्यासाचा पॅपराझींसोबतचा अनुभव शेअर केला आहे. काय म्हणाली अभिनेत्री? चला, जाणून घेऊया…

खरे तर, एका मुलाखीतदरम्यान काजाेल (kajol ) हिला विचारण्यात आले की, ‘तिची मुलगी न्यासा पॅपराझींना कश्याप्रकारे हाताळते? जे अनेकदा तिचे फाेटाे क्लिक करतात.’ यावर काजाेलने उत्तर देत सांगितले की, “पॅपराझींना कसे सामोरे जायचे हे मी तिला शिकवू शकत नाही, ती तिच्या अनुभवातून शिकली आहे.” अभिनेत्रीने आपल्या मुलीचे कौतुक केले आणि सांगितले की, “ती माझ्यापेक्षा ग्रेस आणि सन्मानाने हाताळत आहे. तिच्या जागी मी असते, तर माझी चप्पल  कधीचीच जीर्ण झाली असती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

इतकेच नाही, तर काजोलने तिच्या मुलीचा एक जुना किस्सा देखील शेअर केला आहे. तिने सांगितले की, न्यासाचा जयपूरमध्ये पॅपराझींसोबतचा पहिल्यांदा अनुभव कसा होता. ती म्हणाली, ‘आम्ही दोघे एकटेच होतो आणि कोणत्याही सिक्योरिटीसाेबत प्रवास करत नव्हतो. त्यानंतर फोटोग्राफर्सनी आम्हाला चारही बाजूंनी घेरले आणि आरडाओरडा सुरू झाली. यामुळे ती खूप घाबरली आणि रडू लागली. मी तिला माझ्या मांडीवर घेतले आणि सरळ गाडीकडे गेले. नंतर मी तिला समजावले की, हे त्यांचे काम आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

‘लस्ट स्टोरी 2’मध्ये उत्कृष्ट अभिनय केल्यानंतर, काजोल सध्या तिच्या आगामी वेब सीरिज ‘कोर्ट ड्रामा द ट्रायल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अभिनेत्रीच्या या दमदार सीरजचे ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. ही एक कोर्टरूम ड्रामा सीरिज आहे, ज्यामध्ये काजोल नायिका सेनगुप्ता, वकील, आई आणि पत्नीची भूमिका साकारणार आहे. ही वेबसीरिज 14 जुलैला हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.(bollywood actress kajol told how daughter nyasa handles paparazzi she said meri chappal nikal chuki hoti )

अधिक वाचा-
जान्हवी कपूरने गाेल्डन ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फाेटाेशूट, एकदा पाहाच
शिव ठाकरेची एक्स गर्लफ्रेंड अडकली विवाह बंधनात? जाणून घ्या सत्य

हे देखील वाचा